Sunday, May 3, 2026
HomeनगरShrigonda : बनावट लग्न लावून देणार्‍या टोळीतील दोघे जेरबंद

Shrigonda : बनावट लग्न लावून देणार्‍या टोळीतील दोघे जेरबंद

बनावट नवरी व मावसभाऊ यांना अटक || आरोपींना चार दिवसांची कोठडी

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

राज्यासह परराज्यात अविवाहित तरूणांना पैशांसाठी खोटे बनावट लग्न करुन फसवणूक करणार्‍या टोळीतील बनावट नवरी व मावस भाऊ यांना अटक करण्यात आली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी याबाबतची कारवाई केली आहे. आरोपींना चार दिवसांची कोठडी मिळाली आहे.

- Advertisement -

डिसेंबर 2024 मध्ये श्रीगोंद्याच्या घोगरगाव व आळंदीच्या रिध्दी सिध्दी मंगल कार्यालय येथे फिर्यादी रोहित रमेश तरटे, (वय 28, हॉटेल व्यवसाय, रा. घोगरगाव) यांचे लग्न लावून देण्यात आले. या प्रकरणात तरटे यांची फसवणूक करत बनावट नवरीचा भूमिका निभावणारी महिला आणि तिचा साथीदार, तसेच एजंटचे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत लग्न लावून दिल्याच्या बदल्यात तीन लाख रुपये घेण्यात आले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसात घरातील रोख रक्कम घेवून नवरी पळाली.

याप्रकरणी 11 जुलै 2025 ला श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी बनावट नवरीसह तिच्या साथीदारांचा बुलढाणा, जालना व संभाजीनगर परिसरात शोध घेत असताना तांत्रिक तपास व मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील नवरीचा बनावट रोल करणारी एक महिला, तिचा मावस भावाचा रोल करणारा आकाश तोताराम सुरोसे (वय 31 वर्षे रा. दहिद बुद्रुक, बुलढाणा) असल्याचे समोर आले. या दोघांना बुलढाणा व संभाजीनगर येथून सापळा लावून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींना पोलिसांनी श्रीगोंदा न्यायालयात उभे केले असता त्यांना चार दिवसांची कोठडी मिळाली आहे.

दरम्यान, अशा प्रकारे लग्नाच्या नावाखाली कोणाची फसवणूक झालेली असल्यास त्यांनी श्रीगाेंंदा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, नगर विभाग अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या पथकातील हवालदार संग्राम जाधव, संदीप शिरसाठ, रवि जाधव, संदीप राऊत, अरुण पवार, संदीप आजबे, मयुर तोरडमल व अलका वाघ तसेच सायबर सेल राहुल गुंडु व नितीन शिंदे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार भांडवलकर व फारुख मण्यार करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे...