Thursday, May 7, 2026
HomeनगरHSC Result : नगरचा निकाल 90.32 टक्के; पुणे विभागात दुसर्‍यास्थानी

HSC Result : नगरचा निकाल 90.32 टक्के; पुणे विभागात दुसर्‍यास्थानी

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जून-जुलैत पुरवणी परीक्षा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत गतवर्षीच्या तुलनेज यंदा अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल मागील वर्षीपेक्षा 4 टक्क्यांनी वाढला. यंदाचा निकाल 90.32 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल अधिक असल्याची परंपरा याही वर्षी कायम राहिली.

- Advertisement -

मंडळातर्फे बारावीचा निकाल शनिवारी दुपारी 12 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यावर्षी जिल्ह्यातून बारावीची परीक्षा 31 हजार 924 मुले व 26 हजार 971 मुली अशा एकूण 58 हजार 895 विद्यार्थ्यांनी दिली. त्यातून 27 हजार 694 मुले (86.74 टक्के) व 25 हजार 502 मुली (94.55 टक्के) असे एकूण 53 हजार 196 विद्यार्थी (90.32 टक्के) उत्तीर्ण झाले. मागील वर्षी पुणे विभागात नगर जिल्हा तिसर्‍या स्थानी गेला होता. यंदा मात्र तो दुसर्‍या स्थानावर आहे. जिल्ह्यात जामखेड तालुक्याचा निकाल सर्वाधिक 97.29 टक्के लागला. त्यानंतर संगमनेर (95.01 टक्के) व श्रीगोंदा (94.89 टक्के) तालुक्यांचा क्रमांक लागतो. सर्वांत कमी निकाल शेवगाव (83.92 टक्के) तालुक्याचा लागला.

परीक्षेस बसलेले आणि उत्तीर्ण कंसात टक्के
मुले 31 हजार 924 आणि 27 हजार 694 उत्तीर्ण (86.74 टक्के),मुली 26 हजार 971 आणि 25 हजार 502 उत्तीर्ण (94.55 टक्के).

शाखानिहाय निकाल
विज्ञान 96.55 टक्के
कला 75.59 टक्के
वाणिज्य 85.26 टक्के


निकालाची ठळक वैशिष्ट्ये

यावर्षी प्रथमच गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र निकाल लागल्यापासून 15 व्या दिवशी एकाच वेळी शाळांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. पेपर वाहतुकीसाठी जीपील एनेबल डिजिटल लॉक सिस्टिमचा यशस्वी वापर करण्यात आला.कॉपीमुक्त अभियान: कडक निर्बंधांमुळे यावर्षी निकालात काही प्रमाणात घट झाली आहे. परीक्षेदरम्यान 1 हजार 983 गैरप्रकार आढळले असून 100 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खेळाडू, एनसीसी, स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे गुण देण्यात आले आहेत. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी जून-जुलै 2026 मध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाईल, असे शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले.

सर्वाधिक निकाल जामखेड, संगमनेरचा
अकोले 86.78 टक्के, जामखेड 97.29 टक्के, कर्जत 89.82 टक्के, कोपरगाव 90.96 टक्के, नगर 89.86 टक्के, नेवासा 90.86 टक्केख, पारनेर 91.94 टक्के, पाथर्डी 86.25 टक्के, राहाता 91.59 टक्के, राहुरी 88.73 टक्के, संगमनेर 95.01 टक्के, शेवगाव 83.92 टक्के, श्रीगोंदा 94.89 टक्के आणि श्रीरामपूर 86.08 टक्के एकूण 90.32 टक्के.

डिजिटल पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत विचार
पर्यावरण आणि भविष्यातील वाटचाल या परीक्षेसाठी तब्बल 2 हजार मेट्रिक टन कागद वापरावा लागला. हे लक्षात घेता, भविष्यात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी डिजिटल पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत मंडळ विचार करत असल्याचे संकेत मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिले.

गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया
निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत हवी आहे, त्यांच्यासाठी रविवार 3 मे ते 17 मे 2026 या कालावधीत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. गुण पडताळणीसाठी प्रति विषय 50 रुपये, तर छायांकित प्रतीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना प्रथम छायांकित प्रत घेणे अनिवार्य असून त्यानंतर पुढील 5 दिवसांत 300 रुपये प्रति विषय शुल्क भरून अर्ज करता येईल. जेईई आणि नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षा देणार्‍या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अर्जांना प्राधान्य दिले जाणार आहे. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी जून-जुलै 2026 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : निर्मळपिंपरी बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणी श्रीरामपुरातील डॉ. कुटेसह दोन...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळपिंपरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या गंभीर आणि समाजघातक रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घालत, श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठीत...