Tuesday, May 5, 2026
HomeनगरAhilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

जलस्त्रोत अधिग्रहित करण्याचे अधिकार तहसीलदारांना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे 65 हजार नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून सरकारी पाण्याच्या टँकरमधील पाण्याची गळती अथवा चोरी रोखण्यासाठी विशेष भरारी पथके स्थापन करण्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यातआली.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखेमार्फत टंचाईग्रस्त भागांचे सूक्ष्म देखरेख करण्यात येत असून कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहे. सध्या जिल्ह्यातील 34 गावे व 162 वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली सुमारे 64 हजार 586 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी 30 टँकर (4 शासकीय व 26 खासगी) कार्यरत असून संगमनेर, पारनेर व नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचे प्रमाण अधिक असल्याने तेथे अनुक्रमे 10, 13 व 6 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.
टँकरच्या खेपांबाबतही समाधानकारक प्रगती नोंदविण्यात आली आहे. मंजूर 90.92 खेपांपैकी 88 खेपा पूर्ण करण्यात आल्या असून हे प्रमाण सुमारे 96.79 टक्के आहे. यामुळे टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी वेळेत पोहोचत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पाणी टंचाईवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील 12 विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले असून त्यापैकी 3 जलस्त्रोत थेट गावांसाठी तर 9 टँकर भरण्यासाठी वापरण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त खाजगी जलस्त्रोत अधिग्रहित करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत. संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी आगाऊ कृती आराखडा तयार करण्यात आला असून टँकर प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओआरएस व आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच टँकरद्वारे पाणी पुरवठा करताना गळती किंवा पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...