Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBARC: स्वतःला BARC चा अणुशास्त्रज्ज्ञ भासवणाऱ्याला अटक; १४ नकाशे, संवेदनशील कागदपत्रं सापडली

BARC: स्वतःला BARC चा अणुशास्त्रज्ज्ञ भासवणाऱ्याला अटक; १४ नकाशे, संवेदनशील कागदपत्रं सापडली

मुंबई | Mumbai
भाभा अणु संशोधन केंद्र अर्थात BARC चा शास्त्रज्ञ असल्याचे भासवून जगभर प्रवास करणाऱ्या ५५ ​​वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडे काही संवेदनशील कागदपत्र देखील आढळून आले आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

अटक केलेल्या व्यक्तीकडून सापडली कागदपत्रे
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद असे आहे. मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि गुप्तचर विभाग (आयबी) यांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. वर्सोवा येथील अख्तरच्या निवासस्थानाची झडती घेतली असता गोपनीय माहिती असलेले कागदपत्रे सापडली. या प्रकरणी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

बार्कचे दोन बनावट ओळखपत्रे जप्त
अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच्याकडून देशातील प्रमुख अणुऊर्जा केंद्र असलेल्या बार्कचे दोन बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत. दोन्हीवर वेगवेगळी नावे आहेत. “एका ओळखपत्रावर अलेक्झांडर पामर, तर दुसऱ्यावर अली रझा हुसेन असे नाव होते,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्याला जुन्या नावाने परदेशात जाणे शक्य नव्हते, त्यामुळे त्याने अशाप्रकारे बनावट ओळखपत्रे तयार केल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीला भौतिकशास्त्र आणि हेरगिरीचे दीर्घकाळापासून आकर्षण होते. तो स्वतःला गुप्तहेर किंवा अणुतज्ज्ञ असल्याची ओळख करून द्यायचा. अहमदने यापूर्वी आखाती देशांमध्ये तेल आणि मार्केटिंग कंपन्यांमध्ये काम केलं आहे. २००४ मध्ये त्याला दुबईतून हद्दपार करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्यावर भारताबद्दलची “संवेदनशील माहिती” विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. तथापि, पोलीस, केंद्रीय संस्था आणि अणुऊर्जा विभाग (DAE) यांनी केलेल्या चौकशीत तो दोषी आढळला नाही.

गोपनिय माहिती कुठून आली?
तपासकर्त्यांनी अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमदच्या घराची झडती घेतली असता अनेक कागदपत्रे आणि अणुबॉम्ब डिझाइनशी संबंधित १४ अत्यंत संवेदनशील नकाशे सापडले आहेत. अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमदकडे हे नकाशे कसे आणि कुठून आले? हे नकाशे स्वत:कडे ठेवण्यामागे अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमदचा काय हेतू होता? अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमदचे कोणाशी काय कनेक्शन आहे? भाभा अणु संशोधन केंद्राच्या माध्यमातून घातपात घडवण्याचा काही कट होता का? यासंदर्भातील तपास आता यंत्रणाकडून केला जात आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का यासंदर्भात आता तपास करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Crime News : एक कोटींच्या लुटीच्या कटात दोन पोलिसांसह तोतया पत्रकाराचा...

0
पुणे | प्रतिनिधी | Pune पुण्यातील (Pune) सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलावर भरदिवसा एका मोठ्या व्यावसायिकाला लुटण्याचा चित्रपटालाही लाजवेल असा थरार घडला असून, याप्रकरणी पुणे...