Wednesday, June 17, 2026
HomeनगरRahuri : 35 वर्षीय इसमाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Rahuri : 35 वर्षीय इसमाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द (Kolhar Khurd) येथील कार वस्ती लगत असलेल्या शेततळ्यात पडून एका 35 वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना 14 फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

राहुरी (Rahuri) तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील रहिवासी लक्ष्मण सूर्यवंशी, वय 35 वर्षे, हे 13 फेब्रुवारी 2026 रोजी घरापासून काही अंतरावर असलेल्या शेततळ्याकडे गेले होते. मात्र ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर दि. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह (Dead Body) शेततळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. ग्रामस्थांनी तात्काळ राहुरी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे (Rahuri Police Station) पोलीस नाईक देविदास कोकाटे, पोलीस हवालदार सुरज गायकवाड आदींनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पंचनामा केला.

यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत. दरम्यान मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. याबाबत सध्या आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास राहुरी पोलिसांकडून सुरू आहे.

ताज्या बातम्या

पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ

0
पुणे | प्रतिनिधी Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात...