Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमCrime News : मक्याच्या व्यवहारात शेतकर्‍याची 13 लाखांची फसवणूक

Crime News : मक्याच्या व्यवहारात शेतकर्‍याची 13 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

रूईछत्तीशी (ता. अहिल्यानगर) येथील शेतकर्‍याची विमाननगर, पुणे येथील व्यापार्‍याने 13 लाख 57 हजार 885 रूपयांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बुधवारी (11 जून) अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

रामकृष्ण नामदेव दरंदले (वय 47) असे फसवणुक झालेल्या शेतकर्‍याचे नाव असून त्यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. सुरेश प्रसाद नामक व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 जानेवारी 2024 रोजी रात्री 8 वाजता ते 7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.47 च्या दरम्यान, रूईछत्तीशी येथील शिवारामध्ये मका विक्रीचा व्यवहार करण्यात आला होता. फिर्यादी दरंदले यांनी एकूण 30 लाख 57 हजार 885 रूपयांची मका सुरेश प्रसाद याला विकला. सुरूवातीला सुरेश प्रसाद याने 17 लाख रूपये अदा करून विश्वास संपादन केला.

मात्र, उर्वरित 13 लाख 57 हजार 885 रूपयांची मागणी दरंदले यांनी वारंवार फोनवरून केली असताना, सुरेश प्रसाद याने टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली आणि रक्कम दिली नाही. दरम्यान, सुरेश प्रसाद हा उर्वरित पैसे देत नसल्याचे दरंदले यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश गांगर्डे करीत आहेत.

ताज्या बातम्या

नरेंद्र

PM Narendra Modi: जनसेवा हीच सुशासनाची मोठी कसोटी…; पंतप्रधान नरेंद्र मोदींची...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारचा १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या...