Friday, September 20, 2024
Homeनगर19 हजार शेतकर्‍यांच्या खरीप पिकांचे नुकसान

19 हजार शेतकर्‍यांच्या खरीप पिकांचे नुकसान

शेवगावमधील 31 गावांमधील पिकांना फटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 19 हजार 677 शेतकर्‍यांचे 15 हजार 684 हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 526 मिमी पाऊस झाला असून यात सर्वाधिक नुकसान शेवगाव तालुक्यात सर्वाधिक 31 गावांमधील पिकांचे झाले आहे. दरम्यान, दक्षिणेतील काही तालुक्यात जादाच्या पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्यात पंचनामे सुरू असून त्याचा अहवाल लवकरच तयार होणार असल्याचे सांगण्यात आले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

केरळ किनारपट्टीपासून गुजरात किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा पुन्हा सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात रविवारी (ता.1) 11 मंडलांत अतिवृष्टी झाली. मंडलात सरासरी 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता आणि राहुरी तालुक्याला अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मूग, उडीद या पिकांच्या तोडणीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. कृषी विभागाने शेवगाव तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली आहे. शेवगावातील 31 गावांमधील 15 हजार 684 हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडिद पिकांचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील या मंडलात अतिवृष्टी
– शेवगाव-92.8, बोधेगाव 83.3, भातकुडगाव- 74.3, चापडगाव- 100.3, ढोरजळगाव- 74.3, पाथर्डी-66.5, माणिकदौंडी- 66, टाकळीमानूर-81, कोरडगाव-69.5, करंजी- 81.8, मिरी- 65 या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

– शेवगाव तालुक्यातील 31 तालुक्यातील 33 टक्क्यांच्या आज 15 हजार 684 हेक्टरवर नुकसान झालेले असून 33 टक्क्यांच्यावर नुकसान झालेल्या 15 हजार 684 क्षेत्र आहे. तालुक्यातील 19 हजार 677 शेतकर्‍यांचे कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडिद या पिकांचे नुकसान झालेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या