Sunday, October 4, 2026
HomeनगरAhilyanagar : शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया सुरू

Ahilyanagar : शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026 अंतर्गत निधी वाटपासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्याची व त्यासाठी 1 कोटी 70 लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालये आणि बँकामार्फत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी हे लेखाशिर्ष वापरले जाईल.

- Advertisement -

मंत्रिमंडळाच्या 2 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णयास अनुसरुन संदर्भाधीन शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026 जाहीर करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट लाभाची रक्कम महाआयटी या संस्थेमार्फत ऑनलाईन पध्दतीने डिबीटीव्दारे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

यासाठी नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026 या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीला नेमून दिलेल्या कामकाजासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना प्रत्येकी 5 लाख रुपये इतकी रक्कम मंजूर देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...