Wednesday, June 10, 2026
HomeUncategorizedआपल्या लाडक्या बाबांना 'फादर्स डे'निमित्त शुभेच्छा द्या!

आपल्या लाडक्या बाबांना ‘फादर्स डे’निमित्त शुभेच्छा द्या!

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कधीही न थकणारे शरीर म्हणजे बाबा. कितीही टेन्शन डोक्यात असले तरी घरात आल्यावर चेहऱ्यावर हास्य असलेल्या बाबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्याचा (दि १९) दिवस.मदर्स डे अगदी जल्लोषात साजरी करणारे आपण बाबांचा दिवस कधी असतो ते विसरूनच जातो. प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे (वडिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस) साजरी होतो. या दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्याजोगे खास संदेश….

- Advertisement -

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल

पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात

हॅपी फादर्स डे

——————————————————————————————————————–

चांगल्या शाळेमध्ये टाकायची धडपड करतो,

डोनेशन साठी उधार आणतो,

वेळ ओढली तर हातपाय पडतो,

तो बाप असतो

Father’s Day च्या शुभेच्छा

——————————————————————————————————————–

आपलं मनच आहे जे कायम

आपल्याला मुलगा आणि वडील

म्हणून एकत्र ठेवते

Happy Father’s Day

——————————————————————————————————————–

आपले दुःख मनात लपवून

दुसऱ्यांना सुखी ठेवणारा,

एकमेव देव माणूस

म्हणजे वडील

फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

बाबांचा मला कळलेला अर्थ

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर,

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारे मन,

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन,

मुलांसाठी झटणारे अंतःकरण

Happy Fathers Day

——————————————————————————————————————–

तुमच्यासारखा पिता देवाकडून

मिळालेली देणगी आहे बाबा

तुमच्या आशीर्वादाबद्दल मी आभारी आहे

हॅपी फादर डे बाबा

——————————————————————————————————————–

बाबा म्हणजे

मुलाचा हिरो,

मुला-मुलीचे प्रेम

Fathers डे च्या शुभेच्छा

फादर्स डे मराठी शायरी

तो एक बुद्धिमान आणि

शहाणा पिता असतो जो

आपल्या मुलास ओळखतो

Happy Fathers Day

——————————————————————————————————————–

आपण नेहमीच माझे

पाहिले खरे प्रेम व्हाल,

नेहमीच माझे मित्र रहा,

फादर्स डेच्या शुभेच्छा प्रिय बाबा

प्रत्येक मुलीमागे एक खरोखरच

आश्चर्यकारक पिता असतो

हॅपी फादर्स डे बाबा

——————————————————————————————————————–

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,

माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

बाप हा बाप असतो,

वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो

बाबांचा मला कळलेला अर्थ

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन

मुलांसाठी झटणारं अंतःकरण

आपल्या संकटावर निधड्या छातीने

मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा

शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा

आपले दुःख मनात ठेऊन

दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे ‘वडील’

घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेने नमस्कार –

——————————————————————————————————————–

बाप जिवंत आहेत तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाहीत

एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो …तो म्हणजे बाबा

——————————————————————————————————————-

हिरो हे केवळ पडद्यावर नसतात

तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात – happy fathers day

——————————————————————————————————————–

आईसाठी खूप लिखाण केलं जातं

पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण

आजचा दिवस आहे खास म्हणूनच

तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

——————————————————————————————————————–

बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे

म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे

माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे

कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

——————————————————————————————————————–

मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा!

Happy Fathers Day!

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी

Sunetra Pawar: वर्धापन दिन साजरा करताना मनात वेगळीच…; राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये अनेक घडामोडी पाहिल्या. मोठ्या पक्षांमध्ये मतभेद झाले, दुफळी माजली, पक्षाचे दोन भागही झाले. शरद पवार...