Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : पिंपळगाव खांबला बिबट्या जेरबंद

Nashik News : पिंपळगाव खांबला बिबट्या जेरबंद

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

- Advertisement -

येथील वडनेर दुमाला वडनेर गेट पिंपळगाव खांब या भागात गेल्या काही महिन्यापासून बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे त्यातच नरभक्षक बिबट्याने दोन बालकांचा बळी घेतला होता. त्यामुळे बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने या सर्व परिसरात 18 पिंजरे व 15 कॅमेरे लावले आहे.

दरम्यान आज सायंकाळी पिंपळगाव खांब परिसरात शिवराम नगर या भागात उत्तमराव जाधव यांच्या शेजारील सोमनाथ बोराडे यांच्या उसाच्या शेतात बिबट्या नागरिकांना दिसला त्यानंतर त्यांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबविले व बिबट्याला जेरबंद केले. त्यामुळे आत्तापर्यंत या भागात हा पाचवा बिबट्या जेरबंद झाला आहे.

दरम्यान बिबट्या जेरबंद झाल्याचे समजतात माजी नगरसेवक जगदीश पवार तसेच विक्रम कोठुळे व स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मदत कार्य सुरू केले त्याचप्रमाणे या कार्यवाहीबद्दल स्थानिक नागरिकांनी वनविभाग कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी अमित जाधव प्रभाकर बोराडे सचिन जाधव व पिंपळगाव खांब परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बिबट्या पकडला असल्याचे समजतात त्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

दरम्यान सदरचा बिबट्या पकडल्यामुळे आतापर्यंत या भागात पाच बिबटे जेरबंद झाले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे...