कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – शहरातील इंदिरापथ, संजयनगर येथे जुन्या बांधकाम व गायी बांधण्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली असून याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी विरोधी फिर्यादीवरून तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश धनश्याम गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बाळासाहेब बापूराव जाधव आमच्या शेजारी राहतात त्यांनी आमच्या घरा शेजारी नवीन गळ्याचे बांधकाम केले असून तेंव्हापासून त्यांच्या व आमच्या कुटुंबाचे वाद चालू आहे.तसेच 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास रुपेश कैलास जाधव याचा आमचे घरासमोर गायी बांधण्याचे कारणावरून वाद झाला व मी घरी आलो असता रुपेश कैलास जाधव, संतोष रामभाऊ चव्हाणके, लक्ष्मण सीताराम चव्हाणके, अभी पुणेकर, दादा बाळासाहेब जाधव, रोहिणी बाळासाहेब जाधव, सरुबाई बापुराव जाधव, शंकर यादव, अभी लक्ष्मण चव्हाणके (सर्व रा.इंदिरापथ, संजयनगर, कोपरगाव) हे लाकडी दांडके, विटा तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. मला सोडवण्यासाठी आलेल्या वडील,आई, पत्नीला देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत वरील आरोपीं विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या फिर्यादीत रुपेश कैलास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की,की माझे काका बाळासाहेब जाधव यांच्याकडे राहतो त्यांच्या घर शेजारी राहत असलेले गोविंद घनश्याम गायकवाड यांच्या घराशेजरील जागेवरून बरेच दिवसापासून वाद चालू आहे. दि 21 जून रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मंदिरासमोरून घरी जात असताना योगेश घनश्याम गायकवाड यांच्या सोबत नगर पालिका कचरा डेपो येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरून योगेश गायकवाड हा मोठा मोठ्याने शिवीगाळ करू लागला. तेव्हा मी त्याला म्हालाव तू शिवीगाळ करू नको व मी तेथुन घरी निघून गेलो त्यांनतर योगेश गायकवाड व त्यांच्या घरातील आई मंदाबाई, वडील घनश्याम गायकवाड व पत्नी मयुरी योगेश गायकवाड असे सर्व आले व योगेश गायकवाड याने त्याच्या लाकडी दडांक्याने मारून मला जखमी केले. आमचे भांडण पाहून, काका बाळासाहेब,व काकू,आजी बाहेर भांडण सोडवण्यासाठी आले असता,काका,काकू याना मारहाण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली वगैरे वरून कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.




