Sunday, May 5, 2024
Homeजळगाववाकोद जवळ मृत गाईनी भरलेला ट्रक सोडून चालक पसार

वाकोद जवळ मृत गाईनी भरलेला ट्रक सोडून चालक पसार

वाकोद,Wakod ता. जामनेर :

ट्रकमधील (truck) गाई (cow) मृत (dead) झाल्याने चालकाने (driver) ट्रक तसाच सोडून (leaving) पलायन (Escape) केल्याची घटना वाकोद परिसरातील जळगाव औरंगाबाद महामार्गावर उघडकीस आली आहे.

- Advertisement -

पहुर कडून औरंगाबादकड़े ट्रक क्र. (पी. बी. 03 ए. झेड. 9907) हा गाईंनी भरलेला ट्रक जात होता. दाटीवाटीने गाई भरलेल्या असल्याने आणि त्यांना खाण्यापिण्यास काहीही न मिळाल्याने त्या मृत झाल्या असाव्यात. याची माहिती ट्रक चालकाला झाली. त्यामुळे अशा अवस्थेत ट्रकमधून मृत गाईची वाहतुक करणे धोक्याचे असल्याचे लक्षात येताच त्याने पहूरपासून एक किमी अंतरावरील महामार्गाच्या कडेले ट्रक उभा करून तो दुपारी च पळून गेला. बर्‍याच वेळापासून बेवारस अवस्थेत ट्रक उभा असल्याने आणि त्यातून दुर्गंधी येत असल्याने नागरीकांनी याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांना कळवून देखील पोलिसांनी सायंकाळी येत ट्रकची पाहणी केली.

20 ते 25 गाई मृतावस्थेत

ट्रक ची पाहणी केली असता त्यात सुमारे 20 ते 25 गाई कोंबूंन भरलेल्या व मृत झालेल्या आढळून आल्यात. त्यावरून या गाई औरंगाबाद येथे कत्तलीसाठी नेत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यापुर्वीही अशीच वाहतुक

काही दिवसांपूर्वी जामनेर कडून औरंगाबाद कडे जनावरे कत्तली साठी घेवून जात असलेला ट्रक पहुर पोलिसांनी पाठलाग करीत पकडला होता. त्याच पार्श्वभूमी वर त्याच दिशेने येत असलेला गाईनीं भरलेला ट्रक औरंगाबाद कडे जात असल्याने कत्तल खाण्यात हा ट्रक जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. गाडी मध्ये कोंबलेल्या गाई मृत झालेल्या असल्याने संताप व्यक्त होत होता. एकीकडे जीवदये साठी धडपड सुरू असून दूसरी कडे मोठ्या प्रमाणावर जानवरे खुले आम कत्तलीसाठी जात आहे. याकडे लक्ष देवून पोलिसांनी कठोर पावले उचलावी अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या