Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअखेरीस त्यांनी रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन …

अखेरीस त्यांनी रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन …

- Advertisement -

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

शासकीय कार्यालयांची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत असतानाच दिंडोरी पंचायत समितीतील अधिकारी कर्मचारी मात्र पाच वाजताच गैरहजर असल्याने माकपाने नाराजी व्यक्त केली असून पंचायत समितीचा कारभार बेभरोसे झाल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे .

दिंडोरी माकपाचे विविध समस्या प्रश्न पंचायत समितीमध्ये जाणे येणे असते याच पार्श्वभूमीवर माकपाचे तालुकाध्यक्ष रमेश चौधरी हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत पंचायत समितीमध्ये निवेदन देण्यात गेले परंतु या ठिकाणी पावणे पाच वाजताच सर्व अधिकारी तसेच गट विकास अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी आढळून आले नाही. अनेक विस्तार अधिकारी सुद्धा गैरहजर होते त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या त्यामुळे कामानिमित्त आलेल्या अनेकांनारिकाम्या हाताने परत जावे लागले. अधिकारी कुठे गेले याचा कोणताही खुलासा कर्मचाऱ्यांना व्यवस्थित करता आला नाही.

अखेरीस रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन रमेश चौधरी यांनी तेथून निघून आले. वारंवार पंचायत समितीमध्ये अधिकारी कर्मचारी सापडत नसल्याने माकपाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : पप्पू पास हो गया..

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत'- संपादक काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये...