नवीन नाशिक | प्रतिनिधी
देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील फडोळ मळा येथील किचन ट्रॉलीचे साहित्य बनवणाऱ्या कंपनीला आग लागल्याची घटना असून अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहचत आग आटोक्यात आणली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नविन नाशिक भागातील फडोळ मळ्यात असलेल्या किचन ट्रॉलीचे साहित्य बनवणाऱ्या श्रीष्टी किचन कंपनीला सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आगा लागली. ही आग मोठी असल्याने अग्नीशमानदलास आग विझवण्यासाठी तब्बल २ तास लागले. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या आगीत ५ ते ६ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी नविन नाशिक केंद्र, मुख्यालय, सातपूर, अंबड एमआयडीसी या ठिकाणील ४ बंब दाखल झाले होते. तर ही आग विझवण्यासाठी प्रभारी एम. एन. मधे, लिडींग फायरमन, एम. एन. शेख, ए. ए. पटेल, वाहनचालक एम. पी. अहिरे, ट्रेनी फायरमन संकेत पगारे, शुभम शेवाळे, तुषार पाटील आदींच्या पथकाने तब्बल २ तासांच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




