Wednesday, October 28, 2026
Homeक्राईमCrime News : अल्पवयीन मुलीसह दोन व्यक्तींचे अपहरण

Crime News : अल्पवयीन मुलीसह दोन व्यक्तींचे अपहरण

तोफखाना व कॅम्प पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहर व उपनगरात अपहरणाच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून, त्यात एका अल्पवयीन मुलीसह दोन व्यक्तींचा समावेश आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दोन, तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एका अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपी अज्ञात असून, पोलिसांकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

- Advertisement -

तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यानुसार, बोल्हेगाव येथील अल्पवयीन मुलगी (वय 17) मंगळवारी (29 सप्टेंबर) रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली. अज्ञात व्यक्तीने तिला कायदेशीर रखवालीतून फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने बुधवारी (30 सप्टेंबर) सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली असून अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुसर्‍या घटनेत पाथर्डी तालुक्यातील एका गावातील युवतीला (वय 19) अहिल्यानगर शहरातील एका महाविद्यालय परिसरातून अपहरण झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे. बुधवारी सायंकाळी साडेआठ ते रात्री 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात देखील अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. हराळेमळा, नागरदेवळे येथील संजयकुमार मच्छिंद्रनाथ चव्हाण यांचे मंगळवारी दुपारी एक वाजता अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणास्तव अपहरण केल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीने दिली आहे. त्यावरून कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : सामाजिक सकारात्मकतेचे प्रेरक अभियान

0
थोर समाजसुधारक, महिला सक्षमीकरणाचे आद्य पुरस्कर्ते महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून नुकतेच...