नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
- Advertisement -
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती शिवाजी चौकात गोळीबाराची घटना घडल्याचे कळते .यावेळी संशयितांनी एका चारचाकी गाडीच्या काचा देखील फोडल्या असल्याचे समजते.
घटनेची माहिती समजतात पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त डॉ सचिन बारी यांच्यासह इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे सचिन खैरनार यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.






