नाशिक | Nashik
महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरातची (Ashok Kharat) तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी (Police Custody) संपत असल्याने त्याला आज (सोमवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात (Court) हजर करण्यात आले. यावेळी खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या अड्ड्यातून ‘मळकट द्रव्य’ जप्त; न्यायालयीन कोठडी की पुन्हा कोठडी? आज ‘व्हीसी’द्वारे फैसला
अशोक खरातच्या तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला तिसऱ्या गुन्ह्यात सात दिवसांची म्हणजेच २० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर आता चौथ्या गुन्ह्यात (Forth Case) देखील त्याची पोलीस कोठडी मिळावी यासाठी एसआयटी प्रयत्न करणार आहे. खरातवर आतापर्यंत लैंगिक अत्याचार, खंडणी, सावकारी आणि फसवणुकीचे (Fraud) एकूण १४ गुन्हे दाखल आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सुनियोजित ‘हनी ट्रॅप’; कॉर्पोरेट छळाचा ‘नाशिक पॅटर्न’ उघड
दरम्यान, सरकारवाडा पोलीस ठाण्यातील (Sarkarwada Police Station) गुन्ह्यात त्याची कोठडी संपत असल्याने, एसआयटी आता अन्य गुन्ह्यांत त्याची पुन्हा पोलीस कोठडी मागण्याच्या तयारीत आहे. अशोक खरात प्रकरणात चिंचोंक्याचे खडे बनवून देणाऱ्या महेश कलंत्री या व्यावसायिकापासून ते त्याच्या कार्यालयातील (Office) कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची कसून चौकशी पूर्ण झाली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘टॅब’ वाचवताना अब्रू गेली ! अशोक खरात ‘पार्ट-२’ टाळण्यासाठी पत्रकाराने खेळली रिस्की खेळी





