Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकरोडला वेगवेगळ्या परिसरात पाच तरुणांवर कोयत्याने हल्ले; एक जण गंभीर जखमी

नाशिकरोडला वेगवेगळ्या परिसरात पाच तरुणांवर कोयत्याने हल्ले; एक जण गंभीर जखमी

.

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

- Advertisement -

स्वातंत्र्यदिनी नाशिकरोड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच तरुणांवर कोयत्यासह धारदार हत्यारांनी हल्ले झाल्याने खळबळ उडाली. एकलहरे, राजराजेश्वरी मंगल कार्यालय, देवळाली गाव आणि गवळीवाडा-साठेनगर परिसरात या घटना घडल्या. देवळाली गावातील हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यांतील संशयित आणि जखमींचे वय १७ ते २२ वर्षांदरम्यान असल्याने परिसरातील वाढत्या तरुण गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

एकलहरे येथे एका तरुणावर, तर राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ कोयत्याने हल्ला करण्यात आला. गवळीवाडा-साठेनगर येथेही एकावर धारदार हत्याराने वार झाले. देवळाली गावातील खोले मळा परिसरात जुन्या भांडणाच्या कारणातून दोन तरुणांवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात उपनगर पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मोहन नवनाथ पवार (२१), वैभव विजय पवार (१९), गणेश रामदास पवार (१९) यांच्यासह चार विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे. इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

जुन्या वादातून दोघांवर हल्ला
देवळाली गावातील खोले मळा येथे १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणातून अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रावर लाकडी दांडा व धारदार हत्याराने हल्ला झाला. रेहान इकबाल शेख (१७) याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो मित्र अरोन नायर व नितीन त्रिभुवन यांच्यासह दुचाकीवरून बिटको कॉलेजकडे जात असताना संशयितांनी त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यानंतर खाली पाडून रेहान व अरोन यांच्यावर हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...