Monday, April 20, 2026
Homeदेश विदेशढसा ढसा रडत देवाचा धावा…विमानाच्या ४ तास हवेतच घिरट्या, नेमकं काय घडलं?अंगावर...

ढसा ढसा रडत देवाचा धावा…विमानाच्या ४ तास हवेतच घिरट्या, नेमकं काय घडलं?अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या ‘फ्लाई९१’ (Fly91) एअरलाइन्सच्या विमानाचा मोठा आपघात थोडक्यात टळला आहे. या विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे हे विमान तब्बल चार तास हवेतच घिरट्या घालत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी ३ वाजता Fly91 च्या IC3401 या विमानाने हुबळीसाठी उड्डाण केले. सर्व काही सुरळीत होते, संध्याकाळी ४:३० वाजता विमान लँड होणार होते. पण लँडिंगच्या काही मिनिटे आधीच विमानात बिघाड झाला. विमान कंट्रोल बाहेर जातेय असे वैमानिकाला वाटले आणि त्यामुळे त्याने लॅण्डिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि एक दोन नाही तर ४ तास विमान आकाशात फिरत होते.

- Advertisement -

सुमारे चार तास हे विमान मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा परिसरात हवेतच घिरट्या घालत होते. दरम्यान विमानात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक प्रवासी प्रचंड भयभीत झाले होते. तर अनेक जण रडत-रडत देवाला प्रार्थना करत होते. याशिवाय, प्रवाशांच्या नातलगांनीही एअरलाइन्सवर संताप व्यक्त केला. एअरलाइन्सकडून वेळेवर आणि स्पष्ट माहिती दिली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Japan Tusami Alert: जपानला शक्तिशाली ७.४ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; सुनामीचा दिला अलर्ट

अखेर, हे विमान बंगळुरूकडे वळवण्यात आले आणि सायंकाळी ७:३० च्या सुमारास केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. या यशस्वी लँडिंगनंतर प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे एअरलाइन्सच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, विमानाच्या लँडिंगनंतर या विमानातील परिस्थितीचे व्हिडीओ समोर आले असून घाबरेल्या प्रवाशांचे, रडतानाचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. काही प्रवासी ढसाढसा रडत होते, काही जण एकमेकांना मिठी मारून धीर देत होते, तर काही जण डोळे मिटून देवाचा धावा करत होते. ४ तासांचा हा काळ प्रवाशांसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. आम्ही सुखरूप खाली उतरू की नाही? हा एकच प्रश्न सगळ्यांना सतावत होता. राहून राहून देवाचा धावा करत होते. सुखरुप लॅण्डिंगसाठी प्रार्थना करत होते.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लिफ्ट कोसळून चार जण जखमी; पोलिस ठाण्यात...

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road जेलरोड परिसरातील (Jail Road Area) राहुल नगर या ठिकाणी असलेल्या पारा अव्हेन्यू सोसायटीमध्ये एक लिफ्ट तळमजल्यावरून चौथ्या मजल्यावर जात...