Sunday, September 27, 2026
HomeनगरAhilyanagar : खाद्यपदार्थ स्टॉलवर अन्न व औषधची धाड

Ahilyanagar : खाद्यपदार्थ स्टॉलवर अन्न व औषधची धाड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोफेसर कॉलनी चौकातील विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलची स्वच्छता व खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली. अन्नसुरक्षा अधिकारी डॉ. प्रदीप पवार यांनी खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता तसेच किचनमधील स्वच्छतेची पाहणी करून खाद्यपदार्थ व्यवसायिकांना आवश्यक सूचना दिल्या. खाद्यपदार्थ दर्जेदार ठेवण्यासह किचन स्वच्छ ठेवावे, कुकने आवश्यक ती काळजी घ्यावी तसेच दुकानाचा परवाना दर्शनी भागावर लावावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

- Advertisement -

भविष्यात या नियमांचे पालन न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. प्रदीप पवार यांनी दिला. या मोहिमेत हायजिन फर्स्ट संस्थेचा पुढाकार होता. यावेळी संस्थेच्या संस्थापिका वैशाली गांधी, रूपाली बिहानी, अनुराधा रेखी, विकास जाधव, तुषार भंडारी आदी उपस्थित होते. हायजिन फर्स्ट संस्थेच्या संस्थापिका वैशाली गांधी म्हणाल्या, प्रोफेसर कॉलनी चौक हा हायजिन चौक करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. अन्नसुरक्षा अधिकारी डॉ. प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खाद्यपदार्थांच्या स्टॉलची तपासणी करून संबंधित व्यवसायिकांना स्वच्छतेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : शेअर ट्रेडिंगमध्ये 29 लाखांची फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शेअर ट्रेडिंगमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका निवृत्त कर्मचार्‍याची तब्बल 29 लाख 42 हजार 940 रुपयांची ऑनलाइन...