Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याजबरदस्तीने विवाह; तरुणीची तक्रार

जबरदस्तीने विवाह; तरुणीची तक्रार

खेडलेझुंगे । वार्ताहर Khedlezunge

सद्यस्थितीमध्ये दिल्ली येथील श्रद्धा प्रकरण ताजे असतानाच रुई (ता. निफाड Niphad) येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला घरात घुसून कुटुंबासह संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. रुई (धानोरे) ( Rui- Dhanore ) येथील नाशिक येथे शिक्षण घेत असलेल्या 21 वर्षीय तरुणीसह आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत बळजबरी विवाह केला व नांदावयास न गेल्याने गुंडांच्या टोळक्याने शस्त्रांचा धाक दाखवत विनयभंग व दहशत माजवल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत सदर तरुणीने लासलगाव पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सहा महिन्यांपूर्वी संदीप काशिनाथ नागरे (रा.डोंगरगाव) याच्याशी माझी ओळख व नंतर मैत्री झाली. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी त्याने मला लग्न करण्यासाठी दबाव टाकून आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने माझ्याशी साई वैदिक केंद्र, अशोकस्तंभ, नाशिक येथे वैदिक पद्धतीने विवाह करून घेतला. विवाहाविषयी कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्याआई-वडिलांना मारून टाकेल अशी धमकी दिली.

दि. 22 रोजी माझा भाऊ मला गावी घेऊन आला असता मी हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. 24 नोव्हेंबर रोजी संदीप नागरे यांनी मला घेऊन जाण्यासाठी चिथावणी दिल्याने सायंकाळी माझे वडील, आई असे घरी असताना बापू नागरे, अर्जुन सानप, प्रसाद शेरकर (रा. डोंगरगाव), चंद्रकांत लुंकड (रा. लासलगाव), सागर वाघ (रा.नांदगाव), दिनेश तुपे व त्याची पत्नी सोनाली तुपे (हल्ली मु.नाशिक), प्रवीण सोनवणे (रा.गोंदे, ता.सिन्नर) व एक अनोळखी महिला हे सरपंच असे लिहिलेल्या काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीमध्ये तसेच दोन-तीन मोटरसायकल घेऊन आमच्या घरी आले. प्रवीण सोनवणे, अनिकेत नागरे, प्रसाद शेरेकर, चंद्रकांत लुंकड हातात चॉपर घेऊन व सोबत सोनाली तुपे व सोबतची अनोळखी महिला आमच्या घरात घुसले व आमच्यासोबत संदीप नागरेकडे चल असा आग्रह करू लागले.

मी नकार देताच हातात चॉपर घेऊन आई- वडिलांना मारहाण सुरू केली. चंद्रकांत लुंकड, बापू नागरे हे माझा हात धरून बाहेर ओढू लागले. आईने हस्तक्षेप करताच प्रवीण सोनवणे व दिनेश तुपे यांनी आईची साडी ओढत, अंगलट करून विनयभंग केला. तसेच चापटीने मारहाण केली. सागर वाघ यांनी वडिलांना मारहाण केली. आम्ही आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले असता तुमचे कुटुंबच संपवतो अशी धमकी देत निघून गेले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध लासलगाव पोलीस ठाणे गुन्हा दाखल झाला आहे.

.. तर ग्रामस्थ आत्मदहन करणार

आरोपी संदीप नागरे हा तडीपार आरोपी असून त्याची परिसरात दहशत आहे. या आरोपीच्या त्रासास कंटाळून गावातील व परिसरातील विद्यार्थिनी शाळा, कॉलेज बंद करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सदरहू आरोपींना 48 तासांत अटक न केल्यास विद्यार्थी व नागरिक सामुदायिक आत्मदहन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार रोहित पवार यांना समक्ष भेटून तर मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, महिला आयोग, जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

मुख्य आरोपी संदीप काशिनाथ नागरे, अनिकेत ऊर्फ बापू नंदू नागरे, दिनेश लक्ष्मण तुपे, चंद्रकांत मोहनलालजी लुक्कड, प्रसाद विश्वनाथ शेरे, सचिन ऊर्फ अर्जुन काशिनाथ सानप, सागर वाघ यांना 28 नोव्हेंबर रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी आंदोलन मागे घ्यावे.

राहुल वाघ, स.पो.नि. लासलगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या