Monday, November 30, 2026
Homeक्राईमविदेशी सिगारेट विक्रेत्यावर एलसीबीचा छापा

विदेशी सिगारेट विक्रेत्यावर एलसीबीचा छापा

पाच लाखांचे सिगारेट जप्त || कापड बाजारात कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर शहरात कारवाई करत भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या विदेशी सिगारेट विक्री करणार्‍या व्यापार्‍यावर छापा टाकून पाच लाख तीन हजार रूपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी व्यापारी नरेश जयपालदास कटारिया (वय 42 रा. मिस्कीननगर, तारकपूर, अहिल्यानगर) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, शाहीद शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, प्रशांत राठोड यांचे पथक अवैध धंद्याची माहिती घेत असताना 11 मार्च रोजी मिळालेल्या माहितीवरून नरेश जयपालदास कटारिया याच्या राधास्वामी स्टोअर्स, कापडबाजार येथे छापा टाकण्यात आला. पोलिसांनी पंचासमक्ष दुकानाची झडती घेतली असता प्रतिबंधित विदेशी सिगारेट आढळून आले. त्याच्याकडून पाच लाख तीन हजार रुपयांचे सिगारेट जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अतिवृष्टीग्रस्त 1 हजार 792 विहिरींसाठी 2.61 कोटींचा निधी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar 2025-26 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या तसेच बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारच्या सरकारच्या मृद व जलसंधारण (रोहयो)...