Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशManmohan Singh Funeral : मनमोहन सिंग यांच्यावर उद्या सकाळी १० वाजता होणार...

Manmohan Singh Funeral : मनमोहन सिंग यांच्यावर उद्या सकाळी १० वाजता होणार अंत्यसंस्कार

दिल्ली । Delhi

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

- Advertisement -

गुरुवारी रात्री वृद्धापकाळाशी निगडीत आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री घरीच त्यांची शुद्ध हरपली होती. त्यानंतर मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे एम्सने सांगितले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या (शनिवारी) सकाळी १०-११ दरम्यान अंत्यसंस्कार होणार आहेत. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील राजघाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी काही विशेष प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत.

मनमोहन सिंग यांची मुलगी आज रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीला पोहोचेल. यानंतर त्यांचे पार्थिव उद्या २८ डिसेंबर रोजी काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल. या ठिकाणी काँग्रेस नेते आणि दिग्गज नेते त्यांना श्रद्धांजली वाहतील. यानंतर त्यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ अंत्यसंस्कार केले जातील.

मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी गर्दी करताना दिसत आहे. काल रात्री एम्समधून त्यांचे पार्थिव येथे आणण्यात आले. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...