नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहराच्या मध्यवर्ती भागातील राजीव गांधी भवन परिसरात गुरुवारी (दि.२) दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून सराईत गुंडाने पत्नीला (Wife) भररस्त्यात बेदम मारहाण करत, तिच्या अंगावर थेट ‘फॉर्च्यूनर’ कार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : दिंडोरीतील कार अपघाताच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा
फिर्यादी रोजमीन मुस्तफा शेख (वय २२) ही गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास संशयित पती समीर नासिर पठाण (रा. वडाळा गाव) याच्यासोबत आधार कार्डवरील नाव दुरुस्त करण्यासाठी महापालिकेच्या (Mahapalika) राजीव गांधी भवन येथील कार्यालयात आली होती. काम सुरू असतानाच समीरने पत्नीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि ‘इंस्टाग्राम’वरील चॅट पाहिल्याने त्याचा रागाचा पारा चढला.
हे देखील वाचा : Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे कुटुंबीयांवर काळाचा घाला
भररस्त्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत समीरने तिला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर त्याने तिला बळजबरीने आपल्या फॉर्च्यूनर कारमध्ये (MH १६/७०७२) बसवले. गाडीतही मारहाण सुरूच ठेवली. “तुला आज जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत समीर सीटच्या खालून काहीतरी हत्यार काढू लागला. यामुळे भयभीत झालेल्या रोजमीनने जीवाच्या आकांताने गाडीतून उडी मारली आणि पळू लागली.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!
फॉर्च्यूनरने चिरडण्याचा प्रयत्न
पळून जाणाऱ्या पत्नीचा पाठलाग करत समीरने गर्दीची तमा न बाळगता “तुला आता गाडीखालीच मारतो” असे ओरडत तिच्या अंगावर वेगाने कार घातली. सुदैवाने, गाडीचा धक्का लागून ती बाजूला फेकली गेली. मात्र, गंभीर जखमी झाली. हा थरार पाहून आजूबाजूचे नागरिक धावून आल्याने संशयित पठाण तिथून गाडीसह पसार झाला. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात समीर पठाण विरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : लोंढे पिता-पुत्रांना दणका; महासंचालक कार्यालयाकडून ‘मोक्का’ मंजूर, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल





