नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या (Mahila Sahakari Bank) व महाराष्ट्र राज्य सहकार भारतीच्या माजी अध्यक्षा डॉ.शशिताई अहिरे यांचें आज सकाळी निधन झाले. डॉ. शशिताई अहिरे (Dr. Shashitai Ahire) या रेणुकानगर गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या अर्ध्वयु होत्या. रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना त्यांनीच केली होती. २० वर्षा त्या संस्थेच्या सर्वेसर्वा होत्या.
सहकारी चळवळीत (Cooperative Movement) त्यांनी मोठे योगदान दिले होते. महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांना सक्षम केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त सकाळी शहरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात हेाती. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहकार चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहकार चळवळीत समाजातील तळागळातील जनतेला सामावून घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे आर्थिक सबलीकरण होण्यासाठी शशिताईंनी आयुष्यभर प्रयत्न केले व त्याला यशही आले. महिलांना आर्थिक सबल करण्यासाठी तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी योजना दुर्गम भागातील महिलांपर्यंत नेल्या. तसेच नागरी सहकारी बँकांच्या केंद्र/राज्य/रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया/सहकार खाते आदींकडे असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.