Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAccident : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Accident : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

सिन्नर | वार्ताहर Sinnar

- Advertisement -

नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे ते दातली अंडरब्रीज परिसरात आज (दि.17) पहाटे 3.11 वाजेच्या सुमारास पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सिन्नर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या रुग्णवाहिका चालक पुरुषोत्तम भाटजिरे यांना पहाटेच्या सुमारास गोंदे शिवारात अपघात झाल्याची माहिती दूरध्वनीद्वारे मिळाली. त्यानंतर ते शाम लोंढे आणि गणेश गायकवाड यांच्यासह तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले.

तेथे एम. एच. 14/ के. क्यू. 2361 या क्रमांकाच्या पिकअप वाहनाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यातील चार जणांचा मृत्यू झाला.

एमडी बिसू आसामुद्दीन (25), साजेमन अली साजीबुर रहमान (21), अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम (22) आणि खुर्शीद अलीम अब्दुल रहीम (19) असे मृत व्यक्तींचे नाव आहेत. हे सर्वजण पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यांतील रहिवासी आहेत.

अपघातातील अन्य जखमींवर शहरातील दुसऱ्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तुहीत आलम (19), साजिद आलम (19), समीर हुसेन (20), महेबुबा आलम (20) आणि आयाब अली (20) असे जखमी व्यक्तींचे नावे आहेत.

या घटनेची वावी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार निरगुडे पुढील तपास करीत आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela : नाशिकमध्ये दोन विश्वविक्रमांचे नियोजन – कुंभमेळा प्राधिकरण...

0
नाशिक, दि. १८ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह भक्तिभाव, जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी...