Tuesday, March 25, 2025
HomeनगरAccident News : बोलेरो वाहन विहिरीत पडून चार जणांचा मृत्यू

Accident News : बोलेरो वाहन विहिरीत पडून चार जणांचा मृत्यू

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड (Jamkhed) शहरालगत असणार्‍या जांबवडी रस्त्यावर बुधवार (दि.15) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात बोलेरो चारचाकी वाहन रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नियंत्रण सुटून थेट रस्त्या शेजारी असणार्‍या विहिरीत (Well) कोसळले. या दुर्दैवी घटनेत चारजणांचा मृत्यू (Death) झाला आहे.

- Advertisement -

अपघातातील बोलेरो वाहन जांबवडी गावाच्या दिशेने जामखेडकडे येत असताना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून गाडी घसरली. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बोलेरो रस्त्यालगत असलेल्या बिगर कठ्याच्या विहिरीत (Well) कोसळली. या अपघातानंतर जोराचा आवाज झाल्याने सर्वाचे लक्ष त्याकडे गले. अपघातामुळे (Accident) जांबवडी परिसरात शोककळा पसरली असून अशोक विठ्ठल शेळके (वय 29 रा. जांबवाडी), रामहरी गंगाधर शेळके (वय 35 रा. जांबवाडी), किशोर मोहन पवार (वय 30 रा. जांबवाडी), चक्रपाणी सुनील बारस्कर (वय 25 रा. राळेभात वस्ती) या चौघांचा मृत्यू झाला आहे. हे बोलरो तरूण मातकुळी कडून जांबवाडी मार्गी जामखेडकडे येत होते

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जामखेड येथील संजय कोठारी यांनी तत्काळ घटनास्थळी रुग्णवाहिकेसह धाव घेतली. यावेळी जमलेल्या नागरिकांनी, पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्तांना विहिरीतून (Well) बाहेर काढत रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जामखेडच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात चारजणांचा जागीच मृत्यू (Death) झाला, असल्याचे असे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...