Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेचा मृत्यू

दुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेचा मृत्यू

सिन्नर | वार्ताहर Sinnar

तालुक्यातील गोंदे शिवारात शेतातील काम करून घरी परतत असताना शेतात लपून बसलेल्या बिबट्याने आईसमोरच तिच्या चार वर्षांच्या बालिकेला शेतात ओढून नेत ठार केल्याची घटना शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. जान्हवी सुरेश मेंगाळ (४) असे मृत बालिकेचे नाव आहे.

- Advertisement -

आईच्या डोळ्यासमोर तिच्या मुलीला बिबट्याने ओढून नेताच आई व त्यांच्यासोबत असलेल्या मजुरांनी आरडाओरड करत ज्वारीच्या पिकात धाव घेतली. त्यांच्या आरडाओरडमुळे बिबट्याने जान्हवीला सोडून तेथून पळ काढला. मात्र, बिबट्याने जान्हवीच्या मानेला पकडल्याने मानेला खोलवर जखमा झाल्या होत्या. सोबतच्या मजुरांनी तात्काळ शेतमालक शरद तांबे व प्रकाश तांबे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत जान्हवीला दुचाकीवरून उपचारासाठी सिन्नरला नेले . सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी जान्हवीला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती वनविभाग व वावी पोलिसांना समजतात त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वर्षभरापूर्वी याच भागात बिबट्याने एका आठ वर्षाच्या मुलावर हल्ला करून त्यास ठार केले होते. पुन्हा अशीच घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....