Sunday, October 4, 2026
Homeक्राईमFraud News : माळेगावला कारखान्यात दोनशे कोटींचा अपहार; दोघांविरोधात गुन्हा दाखल

Fraud News : माळेगावला कारखान्यात दोनशे कोटींचा अपहार; दोघांविरोधात गुन्हा दाखल

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील (Malegaon Industrial Estate) क्युपिड लि. कंपनीत कामाला असणाऱ्या दोघांनी कंपनीच्या संचालकांपासून माहिती दडवून ठेवत २०० कोटी रुपयांचा अपहार (Embezzlement) केल्याची तक्रार कंपनीच्या महाव्यवस्थापकाने माळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

तक्रारीत म्हटले आहे की, कंपनीमध्ये असलेल्या ओमप्रकाश छंगामल गर्ग व अन्य एका संशयिताने संगनमताने कट रचून कंपनीच्या नवीन संचालकांची फसवणूक केली. तसेच त्या उद्देशाने महत्त्वाची माहिती जाणून-बुजून लपवून ठेवली. या प्रकरणात अंदाजे २०० कोटींची फसवणूक (Fraud) करून अपहार केल्याचे कंपनीचे महाव्यवस्थापक राजेश रतनलाल सुलतानिया यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, संबंधित कंपनी लिस्टेड कंपनी असल्याने त्यांनी सामान्य जनतेचादेखील विश्वासघात केल्याचा आरोप तक्रारदाराने (Complainant) फिर्यादीत केलेला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पेठ रोडवर चालु हाेती गुप्त घुसखोरी! गेल्या अडीच...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik बांगलादेशातील (Bangladeshi) बेरोजगारी आणि गरिबीला कंटाळून अवैध मार्गाने भारतात (India) प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांसाठी (Citizen) नाशिक शहर सुरक्षित आश्रयस्थान ठरत...