Sunday, September 27, 2026
HomeनगरCrime News : बनावट बक्षीसपत्र करून मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न

Crime News : बनावट बक्षीसपत्र करून मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न

आजारीपणाचा गैरफायदा घेत वृध्दाला घरातून उचलून नेल्याचा आरोप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आजारपणाचा गैरफायदा घेत वृध्दाला जबरदस्तीने घरातून उचलून नेऊन त्यांच्या मालमत्तेवर कब्जा करण्याच्या उद्देशाने बनावट बक्षीसपत्र व साठेखत तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सात जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरूध्द फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, चोरी, अपहरण आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत सुरेश गणेश चितांबर (वय 75, रा. आकांक्षा बंगला, सर्वोदय हौसिंग सोसायटी, बालिकाश्रमच्या पाठीमागे, सावेडी, अहिल्यानगर; सध्या रा. सिंहगड, पुणे) यांनी मंगळवारी (1 सप्टेंबर) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अ‍ॅड. तेजस्वी कुलकर्णी- तवले, मेधा महेशकुमार यादव, रजना मारूती झिने, प्रवीण बबन बारस्कर, सचिन बबन बारस्कर, महेश गोविंद पवार, ज्ञानेश्वर रवींद्र सोनार तसेच बक्षीसपत्रासाठी उभा केलेला एका अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर 2023 ते 3 एप्रिल 2024 या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालय, अहिल्यानगर येथे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादी व त्यांच्या मुलींच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन संशयित आरोपींनी त्यांना बळजबरीने घरातून उचलून नेले. त्यानंतर त्यांची मिळकत बळकावण्याच्या उद्देशाने खोटे बक्षीसपत्र व साठेखत तयार करण्यात आले. या कागदपत्रांवर फिर्यादीच्या खोट्या सह्या करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.

याशिवाय फिर्यादीच्या घरातून मुलींच्या लग्नासाठी ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीची व पितळी भांडी, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड आणि बँकेच्या लॉकरच्या चाव्या घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच फिर्यादीच्या एसबीआय बँक खात्यातील 26 लाख 80 हजार रूपये रोख रक्कम काढून घेतल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या नावावरील एमएच 16 एबी 1829 क्रमांकाची कारही चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : कुटुंबांवर नियतीचा घाला; नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांत तिघांचा बुडून...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik गणरायाला निरोप देण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर (Family) नियतीने काळाचा घाला घातला. गणपती विसर्जनासाठी (Ganpati Visarjan) घरकुल योजना परिसरातील...