Saturday, April 26, 2025
Homeनाशिकमदतीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला गंडा

मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला गंडा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल येथील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा करून भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून ६६ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली आहे.

वसंत देवराव खताळे (रा. पेठरोड, गंगापूर गाव) यांच्या फिर्यादीनुसार, १० तारखेला ते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रसाद सर्कल येथील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यावेळी पाठीमागे उभ्या असलेल्या संशयिताने चोरून पीन नंबर बघितला आणि त्यानंतर मदतीचा बहाणा करीत हातचलाखीने एटीएम बदलून त्यांना दिले. त्यानंतर संशयिताने दुसऱ्या एटीएम मशिनमधून ६६ हजार रुपये काढून घेत गंडा घातला.

या बाबत गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...