मुंबई | Mumbai
“पेट्रोल व डिझेल टंचाई संदर्भात सातत्याने चर्चा सुरु आहेत. त्यात असे लक्षात येतय की सरासरी पेक्षा पेट्रोल व डिझेलची मागणी वाढली आहे. त्याची पुर्तता करत आहोत. मात्र यात साठेबाजी होताना निदर्शनास येत आहे. आता पुरवठा विभाग व गृह विभाग संयुक्त कारवाई करतील. पेट्रोलचा जो आपला वापर आहे त्यापेक्षा 23 टक्के जास्त पुरवठा करत आहोत. डिझेल संदर्भात 52 टक्के मागणी वाढली आहे” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच केंद्र सरकारने कांदा खरेदीच्या भावात वाढ केल्याचे ही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस सांगितले.
इंधनाच्या मागणीत ५२ टक्के वाढ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधनाच्या मागणीची आकडेवारी जाहीर केली. ते म्हणाले, “गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेट्रोलच्या मागणीत २३ टक्के, तर डिझेलच्या दैनंदिन मागणीत तब्बल ५२ टक्के वाढ झाली आहे. भंडारा, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तर डिझेलची मागणी ७० टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. एवढी मागणी वाढूनही आम्ही शेतकऱ्यांना डिझेलचा पुरवठा सुरळीत करत आहोत. “पेट्रोल आणि डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. ते डिझेलची साठेबाजी करत असल्याचे समोर आले आहे, यामुळे टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होत आहे. यात कुठेतरी साठेबाजी होत आहे, असे देखील निदर्शनास येत आहे. त्यासंदर्भात पुरवठा आणि गृह विभाग आता कारवाई करतील.
केंद्र सरकारची उद्या बैठक
कांदा प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, कांदा दरावरून सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कालच केंद्र सरकारने कांदे खरेदीचा भाव साडेतीन रुपयांनी वाढवून जवळपास पंधरा रुपयांपर्यंत नेलेला आहे. कांद्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी देखील सुरू केलेली आहे. आम्ही केंद्र सरकारला या संदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती. उद्या संध्याकाळी त्या संदर्भात बैठक होणार आहे. कांद्याच्या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकार चर्चा करत आहे. पंधरा रुपयांची खरेदी आपण सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्यातले सरकार संवेदनशील आहे. पण काही लोक विनाकारण याबाबत राजकारण करू इच्छितात.
“आम्ही शेतकऱ्यांसाठी बैठक घेत आहोत. आम्हाला कल्पना आहे, फक्त कांदा खरेदीचा दर वाढवून चालणार नाही. या बैठकीत दिर्घकालीन काही होईल का याचा विचार केला जाणार आहे. विरोधकांचे आंदोलन राजकीय आहे. असा टोलाही त्यांनी लगावला. प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झाल्या आहेत. त्यामुळे त्या कोणावर बोलतात हे कळत नाही. बोलताना थोड भान राखले पाहिजे, असे प्रत्युत्तर शिंदे यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी दिले.




