Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमपाईपलाईन रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर छापा

पाईपलाईन रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर छापा

सहा जणांना पकडले || तोफखाना पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सावेडी उपनगरातील पाईपलाइन रस्त्यावरील भाजी मार्केटजवळ पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घालून सहा जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 7 हजार 210 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अंमलदार सतीश त्रिभुवन यांनी फिर्याद दिली आहे. आदिल सत्तार शेख (वय 49 रा. इकरा हायस्कूलच्या पाठीमागे गोविंदपुरा, नगर), अशोक दिनकर आजबे (वय 72 रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी), भाऊसाहेब लहानू लबडे (वय 51 रा. आदेश लॉन्स जवळ, बोल्हेगाव), संजय बाबुराव शिंदे (वय 42, रा. वडारवाडी, भिंगार), रामप्रित रूपलाल रॉय (वय 38 रा. सावली सोसायटी, गुलमोहर रस्ता), नागू गोविंद पवार (वय 68 रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पाईपलाईन रस्त्यावरील भाजी मार्केट परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सदर ठिकाणी छापा घातला असता वरील सहा जण जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 7 हजार 210 रुपयांची रोकड व जुगारचे साहित्य जप्त केले.
पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, अहमद इनामदार, त्रिभुवन यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या