Wednesday, December 4, 2024
Homeनाशिकगणेश गिते यांना विधानसभेत पाठवणार; मतदारांचा निर्धार

गणेश गिते यांना विधानसभेत पाठवणार; मतदारांचा निर्धार

प्रभाग क्रमांक 17, दसकमध्ये प्रचार दौरा

- Advertisement -

पंचवटी । प्रतिनिधी Panchvati

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांनी प्रभाग क्रमांक 17 येथील दसक व परिसरात प्रचार संपन्न झाली. यावेळी गिते यांनी मतदार संघ सुजलाम, सुफलाम करण्यासाठी मला साथ द्यावी, असे आवाहन केले.

गणेश गिते यांचे प्रचार दौर्‍यात नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे) ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, मंगल आढाव, प्रशांत दिवे, दिनकर आढाव, कुलदीप आढाव, अशोक सातभाई, शैलेश ढगे, शरद आढाव, धनु लोखंडे, संजय गांगुर्डे, राजाभाऊ लोखंडे, रोशन आढाव, नितीन चंद्रमोरे, उमेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दसक बस स्टॉप येथील देवी मंदिर, बुद्धविहार, राजवाडा, मारुती मंदिर, दसक गाव, छत्रपती नगर, सातभाई नगर, ओम नगर, रामेश्वरनगर, दुर्गा माता मंदिर, सिद्धेश्वर नगर, मनाली आपारमेंट, स्वामी समर्थ नगर, वैशाली नगर, पिंटू कॉलनी, इंदिरा गांधी पुतळा चौक, अपूर्वा कॉलनी, शिवराम नगर, रुक्माई नगर, हनुमाननगर, लोखंडे मळा, मंगलमूर्ती नगर, बुद्ध विहार, पारिजात नगर, निसर्ग गोविंद, चंपा नगरी, सप्तशृंगी नगर, नारायण बापूनगर, गोदावरी सोसायटी 2 कृष्णा कॉलनी, एमएसईबी कॉलनी, नवरंग कॉलनी, श्री कृष्ण मंदिर आदी ठिकाणी प्रचार करण्यात आला. कार्यक्रमास सुनील बोराडे, रतन बोराडे, बाजीराव आढाव, योगेश नागरे यांच्यासह मतदार उपस्थित होते. अनेक ठिकाणी महिलांनी उमेदवार गिते यांचे औक्षण केले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश गिते यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. महापालिकेत स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय असे काम केले आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी गिते यांना सर्वांनी निवडून द्यावे. ते नक्कीच मतदार संघात विकासाची गंगा आणतील.दत्ता गायकवाड, ज्येष्ठ नेते शिवसेना

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या