Saturday, September 12, 2026
Homeनगरबाप्पाच्या विसर्जनासाठी गेलेल्या युवकांचा तलावात बुडून मृत्यू

बाप्पाच्या विसर्जनासाठी गेलेल्या युवकांचा तलावात बुडून मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विळद घाट (Vilad Ghat) बायपास जवळील साकळाई तलावामध्ये गणपती विसर्जन (Ganesh Immersion) करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू (Youth Death By Drowning) झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. केतन मोहन शिंदे (वय 18, रा. म्हसोबा चौक, रेणुकानगर, बोल्हेगाव) व अजिंक्य बाबासाहेब नवले (वय 16 रा. राघवेंद्र स्वामीनगर, बोल्हेगाव) अशी मयत युवकांची नावे आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त सर्वत्र गणपती बाप्पाला भक्तीमय वातावरणात निरोप दिला जात होता. विळद घाट बायपास परिसरातील साकळाई तलवामध्ये (Sakalai Pond) देखील गणपती विसर्जनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

- Advertisement -

बोल्हेगावमधील (Bolhegaon) अनेक भाविक गणपती विसर्जनासाठी तेथे गेले होते. केतन व अजिंक्य देखील आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. सायंकाळी गणपती विसर्जन केल्यानंतर पाय धुण्यासाठी ते दोघे तलावाजवळ गेले व पाय घसरून तलावात पडले. उपस्थितांनी त्यांना तलावाच्या बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉ. बटुळे यांनी त्यांची तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तशी माहिती त्यांनी रूग्णालयात ड्यूटीवर असलेले पोलीस अंमलदार जठार यांना दिली. अंमलदार जठार यांनी फोनवरून दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

BRICS

BRICS Summit 2026:’आम्ही कोणाच्याही विरोधात नाही’ BRICS परिषदेतून PM मोदींचा संदेश,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित BRICS शिखर परिषदेत सहभागी झालेल्या परदेशी प्रतिनिधींचे स्वागत...