Sunday, September 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांकडून आझाद मैदानावरील आंदोलनाची घोषणा; मुंबईला कोणत्या मार्गे...

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांकडून आझाद मैदानावरील आंदोलनाची घोषणा; मुंबईला कोणत्या मार्गे जाणार, कसे असणार नियोजन?

जालना | Jalna
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा अखेर स्पष्ट झाली आहे. मनोज जरांगे हे गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहे, आज त्यांनी शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची अधिकृत घोषणा केली. अंतरवाली सराटी येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय जाहीर केला. या बैठकीमध्ये मुंबईला कसं जायचं?, मार्ग कोणता असेल?, आझाद मैदानापर्यंत पोहचण्यासाठी मुक्काम कुठे आणि कसा करायचा? यावर चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर मनोज जरांगेंनी मराठा बांधवांशी संवाद साधत सर्वांना मुंबईत येण्याचे आवाहन केले.

मनोज जरांगे पाटील हे उपोषणाच्या १५ व्या दिवशी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सांगितले की, ‘समाज सर्वांचा बाप असतो. मराठ्यांनी पायाखाली चिरडलं तरी ते चिरडून जातील. जो मार्ग असेल तो असेल, कुठूनही गेलं तरी जायचं तिथेच आहे. समाजासाठी लढाई आहे कुणाला खुन्नस द्यायची नाही. आपल्याला मुंबईत जायचं आणि जिंकून यायचं आहे. कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईत जाऊन जिंकून यायचे आहे. मराठा आंदोलकांनी होकार दिल्यानंतर मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. माझा समाज बलशाली आहे. समाजाच्या प्रतिष्ठेसाठी गर्दी होते. आमचा समाज ताकदवान आहे. इथून गाड्या घेऊन निघालो तर २-३ दिवस लागतील.’

- Advertisement -

तीन दिवसांत उत्तर द्या अन्यथा..विद्यानंद बापटांची प्रशासनाला नोटीस; डीजे बंदीचा मुद्दा तापणार?

जरांगेंनी मुंबईला जायचे नियोजन सांगितले
मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजनानुसार १६ सप्टेंबरला पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा, १७ सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, १८ सप्टेंबरला पुण्यातील हडपसर आणि १९ सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असेल. त्यानंतर २० सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचून आंदोलन करण्याचे नियोजन आहे.

अंतरवालीतून मुंबईकडे कूच
मनोज जरांगे पाटील यांनी १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीत मुंबई आंदोलनाची दिशा, मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि पुढील रणनीती यावर चर्चा झाली. बैठकीनंतर जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय स्पष्ट केला. मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा मांडली.

असा असेल मनोज जरांगेंचा मार्ग
अंतरवाली सराटीतून निघणार
16 सप्टेंबर – पहिला मुक्काम – पाटोदा, बीड
17 सप्टेंबर – दुसरा मुक्काम – श्रीगोंदा, अहिल्यानगर
18 सप्टेंबर – तिसरा मुक्काम – हडपसर, पुणे
19 सप्टेंबर – चौथा मुक्काम – खोपोली, रायगड
20 सप्टेंबर – आझाद मैदान, मुंबई

मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील प्रत्येक गावातील मराठा समाजातील बांधवांना मुंबईला येण्याचं आवाहन केलं आहे. ठरलेल्या मार्गानेच मुंबईला यायचं आहे. ज्यांना मुंबईला येणं शक्य नाही, त्यांनी ठरलेल्या मार्गावर येऊन आम्हाला आशीर्वाद द्यायचे आहेत. कुटुंबासह सर्वांनी या मार्गावर यायचं आहे. तुमच्या गावापासून कितीही लांबचं अंतर असलं तरी तुम्हाला या मार्गांवर येऊन आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. तुमचा आशीर्वाद हा केवळ आशीर्वाद राहणार नाही, तर ती तुमची ताकद दिसणार आहे, असं जरांगे यांनी सांगितलं.

जे लोक येणार नाही, त्या गावातील लोकांनी सर्वांनी वर्गणी काढायची आहे. मुंबईला जाणाऱ्यांसाठी वाहने करून द्यायची आहेत. तसेच त्यांना शिदोरीही द्यायची आहे. एकावरच ताण पडू नये म्हणून सर्वांनी मिळून सामूहिकरित्या हे करायचं आहे.

दररोज १०० किलोमीटर अंतर पार करण्याचा दावा
मुंबईकडे जाताना दररोज सुमारे १०० किलोमीटर अंतर पार करण्याचे नियोजन असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मार्गातील विविध जिल्ह्यांमधील मराठा बांधवांनी रस्त्यावर येऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, मात्र सर्वांनी शांततेचे पालन करावे.

‘दगडफेक-जाळपोळ करू नका’
मुंबई आंदोलनाबाबत मनोज जरांगे यांनी समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. दगडफेक किंवा जाळपोळ करू नये, वाहनं शांतपणे चालवावीत आणि आंदोलन लोकशाही मार्गाने करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी शिस्त पाळावी, ओव्हरटेक करू नये आणि आंदोलन शांततेत पार पाडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आझाद मैदानावर बेमुदत उपोषण
मुंबईत पोहोचल्यानंतर आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता अंतरवाली सराटीतील आंदोलनानंतर मुंबईतील आंदोलन कसे आकार घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन
विशेष म्हणजे यंदा गणेशोत्सव सुरू असतानाच जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत पोहोचण्याचे नियोजन आहे. २० सप्टेंबरला आझाद मैदानावर पोहोचण्याचे नियोजन असल्याने त्या काळातील मुंबईतील वाहतूक, कायदा-सुव्यवस्था आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईतील आंदोलनासाठी परवानगीचा मुद्दाही चर्चेत आहे. यासंदर्भात न्यायालयीन पातळीवरही घडामोडी सुरू आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; स्विमिंग पूलात उडी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी रिसॉर्टवर गेलेल्या एका तरुणाचा (Youth) वीजेचा तीव्र धक्का (इलेक्ट्रिक शॉक) लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली...