Thursday, May 7, 2026
HomeनगरKopargav : गंगा गोदावरी महाआरती; कोपरगावच्या आध्यात्मिक परंपरेचा दिमाखदार सोहळा

Kopargav : गंगा गोदावरी महाआरती; कोपरगावच्या आध्यात्मिक परंपरेचा दिमाखदार सोहळा

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी होणारी गंगा-गोदावरी महाआरती यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. संजीवनी युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीबेरंगी रोषणाई, मधुर संगीत, हजारो दिव्यांची आरास आणि फटाक्यांच्या आतषबाजीने गोदावरीचा घाट उजळून निघाला. या भव्य सोहळ्यात हजारो भाविकांनी भगवान शंकर महादेव आणि गोदामातेची आरती करून आपल्या श्रद्धेचा अनुभव घेतला.

- Advertisement -

संजीवनी युवा प्रतिष्ठान केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय उपक्रमांसाठीही ओळखले जाते. नुकत्याच झालेल्या मएक राखी जवानांसाठीफ या उपक्रमात त्यांनी सव्वा लाखापेक्षा जास्त राख्या सीमेवरच्या सैनिकांपर्यंत पोहोचविल्या. शिर्डी ते श्रीनगरपर्यंत काढलेली ही राखी यात्रा विशेष कौतुकास्पद ठरली. अशा कार्यांमुळे प्रतिष्ठानने लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.

या आरती सोहळ्याप्रसंगी जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज आणि आत्मा मालिक ध्यानपीठाचे महंत परमानंद महाराज यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. परमानंद महाराजांनी भविष्यात होणार्‍या कुंभमेळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि गोदाघाटावर नवीन घाट बांधण्याची मागणीही केली. या सोहळ्यादरम्यान स्नेहलताताई कोल्हे यांनी महत्त्वाचा संकल्प जाहीर केला. आगामी कुंभमेळ्यातील सर्व पर्वण्या संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे भव्य प्रमाणात आयोजित केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच, प्रत्येक नागरिकाने गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

युवानेते विवेक कोल्हे यांनी सांगितले, कुंभमेळ्यातील सर्व पर्वण्यांचे आयोजन दिमाखदार पद्धतीने केले जाईल आणि त्यासाठीची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. नागरिकांना दरवर्षीप्रमाणे कुंभमेळ्यातही आरतीचा लाभ मिळावा यासाठी उत्तम व्यवस्था केली जाईल, असे ते म्हणाले. या सोहळ्याला बिपीन कोल्हे, रेणुका विवेक कोल्हे यांच्यासह अहमदाबाद येथून आलेले साई मंदिर ट्रस्टचे विश्वस्त तसेच हजारो भाविक उपस्थित होते. कोपरगाव नगरपरिषद, पोलिस प्रशासन आणि पत्रकार बांधवांनी या सोहळ्यासाठी मोलाचे सहकार्य केले. गंगा-गोदावरी घाटावर झालेली ही आरती केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा एक अनुपम सोहळा ठरला.

ताज्या बातम्या

Crime News : बेकायदेशीर ‘कॅफे’वर पोलिसांचा छापा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील सावेडी परिसरात अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील झेड.के. बॉलीवुड कॅफे येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कथित ‘कॅफे’वर तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी (5 मे) सायंकाळी...