Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यारस्त्याच्या कडेला कचरा, जबाबदार कोण?

रस्त्याच्या कडेला कचरा, जबाबदार कोण?

पंचवटी । प्रतिनिधी Panchvaṭī

नाशिक शहर व परिसरातील विविध नगरात चौका-चौकात आणि रस्त्यांच्या कडेला ( Garbage on Road Side )प्रचंड प्रमाणात सर्वत्र कचराच कचरा पसरलेला दिसतो. पसरलेल्या कचर्‍यामुळे परिसर अस्वच्छ दिसत असून नाशिकचे सौंदर्य खुलण्यापेक्षा सौंदर्यात बाधा निर्माण झाली आहे.

- Advertisement -

पसरलेला कचरा अनेक दिवसांचा असल्याने दुर्गंधी देखील पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास व मच्छर यांचे प्रमाण देखील वाढले आहे. पसरलेल्या कचर्‍याच्या अवतीभोवती अनेक गाई, म्हशी, घोडे ,कुत्रे, गाढवे, डुकरे यांची गर्दी दिसत असते. मोकाट जनावरांचे प्रमाण देखील वाढले आहे. कचर्‍यातील प्लास्टिक व इतर वस्तू खाल्ल्याने जनावरांचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे. स्मार्ट नाशिक बनत असतानाच कचरामुळे परिसर व नाशिक कचरामय दिसत आहे.

सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिकची कल्पना फक्त भिंतीवर व कागदावर लिहिण्यापूर्ती मर्यादित दिसत आहे. स्वच्छ नाशिक -सुंदर नाशिक बनवण्यासाठी आरोग्य विभागाला नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. आपल्या घरातील व परिसरातील, अंगणातील कचरा नागरिक जर रस्त्याच्या कडेला व चौका चौकात बिनधास्तपणे टाकत असतील तर आपले नाशिक स्वच्छ कसे होणार, आपले आरोग्य नीट कसे राहणार आणि स्वच्छ नाशिक- सुंदर नाशिक, स्मार्ट नाशिकचे स्वप्न तरी कसे पूर्ण होणार, असा सवाल ज्येष्ठ नागरिक व विचारवंत करीत आहेत.

शहर व परिसरात चौकाचौकात टाकला जाणारा कचरा नियमित उचलला जावा. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने खास व्यवस्था करावी. त्याचबरोबर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी. दंडात्मक कारवाई करताना कोणत्याही प्रकारचे कुचराई करू नये तरच नागरिकांचे आरोग्य नीट राहील व नाशिक स्वच्छ होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या