Saturday, August 29, 2026
HomeनगरAhilyanagar : 2 लाख गॅस ग्राहकांची होणार अडचण

Ahilyanagar : 2 लाख गॅस ग्राहकांची होणार अडचण

दोन दिवसात ई-केवायसी करण्याचे आव्हान

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना ई-केवायसी करण्याची मुदत आता अवघे दोन दिवस राहिली आहेत. परंतू ग्राहकांना ई-केवायसी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, एकट्या नगर जिल्ह्यात 2 लाख ग्राहकांनी आतापर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने अडचणी निर्माण होणार आहेत. जिल्ह्यात एलपीजी सिलिंडरचा पुरवठा करणार्‍या प्रमुख तीन कंपन्या व त्यांचे 12 लाखांवर ग्राहक आहेत. एलपीजी ग्राहकांची अद्ययावत माहिती ठेवण्यासाठी ही प्रक्रिया करणे कंपन्यांनी अनिवार्य केले आहे.

मुदतीत बायोमेट्रिक वा ई-केवायसी पडताळणी न करणार्‍या ग्राहकांना व्यावसायिक दराने सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. अंतिम मुदतीपर्यंत ई-केवायसी न करणार्‍यांची सबसिडी तात्पुरती स्थगित केली जाईल. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना घरगुती दराऐवजी बाजारभावाने विकत घ्यावा लागणार आहे.
जिल्ह्यात आजघडीला 12 लाख 83 हजार 401 ग्राहक आहेत. त्यातील 81.30 टक्के ग्राहकांनी ई-केवायसी केली असली तरी अद्यापही 2 लाख 2 हजार 847 ग्राहक एजंसीकडे फिरकलेच नाहीत. परंतु आता शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने ग्राहकांची तारांबळ उडाल्याचे दिसून येत असून गॅस एजंसीवर मोठी गर्दी होणार आहे.

बोटांचे ठसे न जुळणे
वयोवृद्धांच्या बोटांचे ठसे न जुळणे, आधार अपडेट नसणे, मोबाइल लिंक नसल्याने ग्राहकांची ई-केवायसी पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे केवायसीची मुदत संपल्यानंतर रिफील सिलिंडर मिळेल की नाही याबाबत ग्राहक संभ्रमात आहेत.

कंपनीनिहाय गॅस ग्राहक आणि केवायसी न झालेले
बीपीसीएल 7,57,215 (97 हजार 888), एचपीसीएल 4,32,302 (82 हजार 361), आयओसीएल 93,948 (22 हजार 623).

ताज्या बातम्या

दर महिन्याला काहीतरी कार्यक्रम ठेवा, मुख्यमंत्री नाशिकला येतील आणि रस्त्यावरील खड्डे...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोटारीने नाशिकला आले म्हणून शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्यात आले, अशी मिश्किल टोलेबाजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिकच्या...