Sunday, September 27, 2026
Homeक्राईमCrime News : घरगुती गॅस रिफीलिंग करणारी टोळी पकडली

Crime News : घरगुती गॅस रिफीलिंग करणारी टोळी पकडली

एलसीबीची नगर तालुक्यात कारवाई || 33.65 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

घरगुती वापरासाठी असलेले एलपीजी गॅस सिलेंडर बेकायदेशीररीत्या व्यवसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफील करून विक्री करणार्‍या तीन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी (29 ऑक्टोबर) सायंकाळी चिचोंडी पाटील (ता. अहिल्यानगर) शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल 33 लाख 65 हजार 500 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

प्रवीण नारायण खडके (वय 28, रा. चिचोंडी पाटील), वैभव अंबादास पवार (वय 47, रा. सांडवा, ता. अहिल्यानगर) व गणेश पद्माकर भोसले (वय 37, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण नारायण खडके हा आपल्या साथीदारांसह घरगुती गॅस टाक्या वापरून व्यवसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफीलिंगचे अवैध काम करीत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना मिळाली होती.

त्यांनी उपनिरीक्षक अनंत सालुगडे व त्यांच्या पथकातील अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश लबडे, हृदय घोडके, बिरप्पा करमल, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, मनोज साखरे, महादेव भांड, उमाकांत गावडे यांना कारवाईसाठी रवाना केले. पथकाने तातडीने चिचोंडी पाटील गावात छापा टाकला. तेथे प्रवीण खडके, वैभव पवार आणि गणेश भोसले हे तिघेही प्रत्यक्ष रिफीलिंग करताना आढळले. चौकशीत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे उघड झाले.

छाप्या दरम्यान 25 लाख 10 हजार रूपये किंमतीची चार वाहने, 8 लाख 31 हजार 700 रूपये किंमतीच्या 264 घरगुती गॅस टाक्या, गॅस रिफीलिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण 33 लाख 65 हजार 500 रूपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...