अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (15 सप्टेंबर) दुपारी जुनी महानगरपालिकेजवळ हौसिंग हॉस्पिटल समोरील पत्रा शेडवर छापा टाकून बेकायदेशीर गॅस रिफिलिंग धंदा उध्वस्त केला. या कारवाईत 38 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वसिम मुक्तार पठाण (वय 20, रा. पंचपिर चावडी, अहिल्यानगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार गणेश धोत्रे व सुनील पवार यांनी तात्काळ कोतवाली पोलिसांशी संपर्क साधून छापा घालण्याची मोहीम हाती घेतली. उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.





