Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडागौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

मुंबई | Mumbai

- Advertisement -

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. गौतम गंभीर भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची जागा घेणार आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकपच्या स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे गंभीर याची त्याच्याजागी निवड झाली आहे.

गौतम गंभीरने आयपीएल २०२४ मध्ये मेंटाॅर म्हणून काम करताना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला तिसरे विजेतेपद मिळवून दिले होते. तसेच त्याने लखनौ सुपर जायंट संघाला मेंटाॅर म्हणून दोन वेळा आयपीएल बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच कर्णधार म्हणून कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल २०१२ आणि २०१४ मध्ये चॅम्पियन बनवले होते. गंभीरला आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत प्रशिक्षक (Coach) पदाचा अनुभव नाही.

आयपीएल (IPL) २०११-२०१७ या पाच वर्षात गंभीरने कर्णधार म्हणून कोलकाता नाईट रायडर्स संघाला ५ वेळा बाद फेरीत पोहोचविले होते तसेच आयसीसी टी २० वर्ल्डकप २००७ आणि आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात ७५ आणि ९१ धावांची खेळी साकारून भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. राहुल द्रविडला २०११ मध्ये भारतीय संघाचा प्रशिक्षक बनवण्यात आले होते. मात्र, आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ मध्ये साखळी सामन्यात भारतीय संघाला गाशा गुंडाळावा लागला होता.

तसेच २०२२ टी २० वर्ल्डकप स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत भारतीय संघाचा (Team India) पराभव झाला होता. आयसीसी वनडेच्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर द्रविडचा कार्यकाळ समाप्त झाला होता. मात्र, भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केल्यामुळे राहुल द्रविडचा कार्यकाळ १ वर्षासाठी वाढवण्यात आला होता. आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२४ मध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका विरूध्द ७ धावांनी विजय संपादन करून राहुल द्रविड यांना विजयी निरोप दिला होता.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या