नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रेल्वेत प्रवास करणाऱ्या महिलेची बॅग चोरी करणाऱ्या संशयिताला (Suspected) रेल्वे पोलिसांनी (Railway Police) अटक (Arrested) केली असून त्याच्याकडून सुमारे ४ लाख ९५ हजार ४३१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : अंगठीचा फास, धनादेशांचा तपास; भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे येथील ज्योती हनुमंत भारती या २८ जानेवारी रोजी राज्यराणी एक्स्प्रेसने नांदेडहून (Nanded) ठाण्याकडे प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग चोरली होती. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रोहित मारुती दुवेदार (रा. नांदेड) यास ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, कानातील झुमके, सोन्याची अंगठी, रोख रक्कम तसेच मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Nashik TCS Case : ‘मालेगाव पार्टी’ रडारवर; पीडितेची ओळख पुसण्याचा होता कट
दरम्यान, चोरीतील दागिने (Stolen Jewelry) विकत घेणाऱ्या नामदेव आनंदराव मुंडकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन बनकर, उपनिरीक्षक राजेश सोनवणे, संजय केदारे, सहाय्यक फौजदार संतोष उफाडे, हवालदार शैलेन्द्र पाटील, रघुनाथ सानप तसेच आरपीएफचे लक्ष्मण वाघ, सागर वर्मा आदींच्या पथकाने केली.
हे देखील वाचा : Nashik TCS Case : पीडित तरुणीचे नाव बदलून ठेवलं ‘हानिया’; टीसीएस धर्मांतर प्रकरणात ‘मलेशिया’ कनेक्शन उघड





