Monday, September 28, 2026
Homeक्राईमNewasa : गावठी दारु अड्ड्यावर एलसीबीचा छापा

Newasa : गावठी दारु अड्ड्यावर एलसीबीचा छापा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या छाप्यात हातभट्टी दारु अड्ड्यावर छापा टाकून 20 लिटर तयार दारु जप्त केली असून एका महिलेवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली. याबाबत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर आबासाहेब शिरसाठ यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 21 नोव्हेंबर रोजी पोलीस निरीषक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशाने अवैध धंंद्यांवर कारवाई करण्याकामी नेवासा पोलीस ठाणे अंतर्गत कुकाणा पोलीस दूरक्षेत्राअंतर्गत पेट्रोलिंग करत असताना भेंडा बुद्रुक शिवारात बानुबाई राजू पवार ही महिला हातभट्टीची दारु तयार करुन विक्री करत असल्याचे समजले.

- Advertisement -

छापा टाकला असता 3000 रुपये किमतीची प्लस्टीकचे ड्रममध्ये अंदाजे 20 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु तसेच 21 हजार रुपये किमतीचे 100 लीटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन असा एकूण रुपये 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महिलेविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात पो. स्टे. गुन्हा रजि. नं.984/2025 मु.प्रो. का कलम 65 (ई) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून कारवाई करण्यात आली.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 360 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 5153 कॅरेटची आवक झाली....