Wednesday, November 18, 2026
HomeनाशिकNashik News : जिल्ह्यातील २४५ शिक्षक ठरले 'आयडॉल'; नाशिक राज्यात तिसऱ्या स्थानावर

Nashik News : जिल्ह्यातील २४५ शिक्षक ठरले ‘आयडॉल’; नाशिक राज्यात तिसऱ्या स्थानावर

नाशिक | विजय गिते | Nashik

शैक्षणिक गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण अध्यापनाच्या क्षेत्रात नाशिक जिल्ह्यात (Nashik District) राज्यस्तरावर आपली उत्तम छाप पाडली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जाहीर केलेल्या ‘आयडॉल’ शिक्षक यादीत नाशिक जिल्ह्यातील तब्बल २४५ शिक्षकांची निवड झाली आहे. राज्यभरात पुणे आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यांनंतर नाशिकने तिसरा क्रमांक पटकावला असून, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

- Advertisement -

शालेय शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयडॉल शिक्षक आणि आयडॉल शाळा हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा राज्यभरात ४,४८४ शिक्षकांची निवड झाली असून, यामध्ये पुणे (४८७), सोलापूर (२६०), नाशिक (२४५), अहिल्यानगर (२३७) आणि सातारा (२२६) हे जिल्हे आघाडीवर आहेत. निवड झालेल्या शिक्षकांना राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षण आणि कार्यशाळांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी करून घेतले जाणार आहे.

तालुकावार चित्र

नाशिक तालुक्यातून (Nashik Taluka) सर्वाधिक ४८ शिक्षकांची निवड झाली आहे. त्यापाठोपाठ सिन्नर ३१ आणि मालेगाव २८ तालुक्यांचा क्रमांक लागतो. तसेच इगतपुरी २५, येवला २०, कळवण १९, नांदगाव १७, निफाड १६, दिंडोरी १४, देवळा १२, बागलाण व सुरगाणा प्रत्येकी ६, पेठ २ आणि चांदवडमध्ये १ शिक्षकाची निवड झाली आहे. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात (Trimbakeshwar Taluka) एकाही शिक्षकाला यादीत स्थान मिळालेले नाही.

ताज्या बातम्या

संजय

शायना एनसींच्या कृतीवर संजय राऊत संतापले, दोन शब्दांत व्यक्त केला राग!

0
मुंबई | Mumbaiशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांनी सोनिया गांधी...