Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमकोपरगावात हातभट्टी अड्ड्यावर छापा

कोपरगावात हातभट्टी अड्ड्यावर छापा

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शहरापासून जवळच असलेल्या खडकी (Khadki) शिवारात चालणार्‍या गावठी हातभट्टी अड्ड्यावर (Gavathi Hand Furnace Alcohol Den) पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहताच हातभट्टी चालक फरार झाला. पोलिसांनी एक लाख 2 हजार रूपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. शहरापासून जवळच खडकी शिवारातील काटवनात अवैध गावठी दारू बनविण्याचा अड्डा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह शुक्रवारी सायंकाळी अड्ड्यावर (Police Raid) धाड टाकली.

- Advertisement -

त्यावेळी हातभट्टी दारू (Gavathi Hand Furnace Alcohol Den) तयार करणारा बाळु नामदेव भालेराव हा पोलिसांना पाहताच फरार झाला. यावेळी पोलिसांना 90 हजार रूपयांचे 1800 लिटर रसायन, 9 प्लास्टीकचे ड्रम व त्यामध्ये भरलेली प्रत्येकी 200 लिटर गावठी दारू, जाळण्यासाठीची लाकडं, नवसागर असा एकूण 1 लाख 2 हजार 820 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात (Kopargav Police Station) पोलिस कॉन्स्टेबल गणेश मैड यांच्या तक्रारीवरून बाळू नामदेव भालेराव याच्या विरूद्ध म.प्रो. क्ट कलम 65 (फ), (क), (ड), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या