Thursday, March 13, 2025
Homeनगरगावठी कट्ट्यासह एकास अटक, श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई

गावठी कट्ट्यासह एकास अटक, श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला दि.16 सप्टेंबर रोजी रात्री 11:45 च्या सुमारास शहर पोलिसांनी एका तरुणास गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. याबाबतची पोलीस सूत्राकडून समजलेली माहिती अशी, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर पृथ्वी हॉटेलजवळ एकाकडे कमरेला गावठी कट्टा आहे.

- Advertisement -

या माहितीवरून त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, दीपक मेढे यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ पृथ्वी हॉटेल येथे जात तेथे उभा असलेल्या महेश विश्वकर्मा याची झडती घेतली असता त्याच्याजवळ कमरेला एक गावठी कट्टा मिळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याच्याकडील गावठी कट्टा जप्त करून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, राहुल नरवडे, अजित पठारे, संभाजी खरात, रमीज राजा आतार, रामेश्वर तारडे, आजिनाथ आंधळे, रघुवीर कारखिले, श्री.पौळ यांनी केली. विश्वकर्मा याच्यावर राहुरी व कोपरगाव येथे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...