Wednesday, June 10, 2026
Homeनगरशिपायाचे विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे

शिपायाचे विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे

शहरातील नामांकित हायस्कूल मधील प्रकार

अहमदनगर (प्रतिनिधी) – शाळेत आलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या चावट शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. आत्माराम बापुराव लगड (वय- 58 रा. आठवड ता. नगर) असे अटक केलेल्या शिपायाचे नाव आहे.

- Advertisement -

पिडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. 2) आणि बुधवारी (दि. 4) अशा दोन वेळेस शिपायाने मुलीशी गैरवर्तन केले. पिडित मुलीची आई धुणीभांडी करते. मुळची बीड जिल्ह्यातील आष्टी येथील असलेले हे कुटुंब उदरनिर्वाहाकरीता नगरमध्ये वास्तव्यास आहे. सावेडी भागात राहणार्‍या या कुटुंबातील मुलगी शहरातील रेसिडेन्शिअल  हायस्कूलमध्ये शिक्षण घेते. सोमवारी (दि. 2) सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली. शिपाई असलेल्या लगडने तिच्याशी सातवीच्या वर्गातच लज्जास्पद वर्तन केले. नको त्या ठिकाणी हात लावत तिच्याशी अश्‍लिल चाळे केले.

शिपायाने बुधवारी (दि. 3) परत तसेच कृत्य केले. त्यामुळे मुलीने झालेला प्रकार घरी पालकांना सांगितला. त्यानंतर पिडित मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. लगड यांच्याविरूद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.शाळेच्या शिपायाकडूनच असे वर्तन होत असेल तर मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar Darshan Scam : डिजिटल पुराव्यांच्या चक्रव्यूह; ३०० पानांच्या दोषारोपपत्रातून गैरव्यवहाराचे...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी (Police) न्यायालयात (Court) तब्बल ३०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट)...