Thursday, June 18, 2026
Homeक्राईमNashik Crime News : शेल अकाऊंट्सचे जाळे; सायबर खेळ करुन ३३ कोटींचा...

Nashik Crime News : शेल अकाऊंट्सचे जाळे; सायबर खेळ करुन ३३ कोटींचा गंडा घालणारे हॅकर रडारवर

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिककरांना ऑनलाईन गुंतवणुकीच्या (Online Fraud) आणि भीतीपोटी डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांची पाळेमुळे थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरले आहेत. १ जानेवारी २०२६ ते ३१ मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या तपासातून हा पॅटर्न उघड झाला असून, या केवळ ५ महिन्यांत नाशिककरांना (Nashik) तब्बल ३३ कोटी १६ लाख २४ हजार ५८ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.  

- Advertisement -

या लुटीमागे स्थानिक टोळ्या नसून, आंतरराष्ट्रीय स्तरावरून आणि भारतातील (India) वेगवेगळ्या राज्यांतून ‘शेल अकाऊंट्स’चा (बनावट बँक खाती) वापर करून चालवले जाणारे संघटित रॅकेट सक्रिय असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न हाेत आहे. सायबर चाेरट्यांनी नाशिककरांकडून लुटलेली रक्कम स्वतःच्या खात्यावर न घेता, देशातील विविध राज्यांमध्ये गरीब किंवा अशिक्षित लोकांच्या नावावर उघडलेल्या ‘शेल अकाऊंट्स’मध्ये (बनावट बँक खाती) वळती केली आहे.

नाशिकमधील पीडित व्यक्तीने पैसे ट्रान्सफर करताच, हे पैसे (Money) काही मिनिटांत एका शेल अकाऊंटमधून दुसऱ्या आणि दुसऱ्यामधून तिसऱ्या खात्यात वळवले जातात. भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील या खात्यांमधून शेवटी ही रक्कम क्रिप्टो करन्सी किंवा आंतरराष्ट्रीय गेटवेद्वारे देशाबाहेर पाठवली जाते. यामुळे पोलिसांना पैशांचा माग काढणे अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे.

​’शेअर मार्केट’ आणि ‘डिजिटल अरेस्ट’मधून लूट

नाशिक शहरात दाखल ​एकूण ४१ गुन्ह्यांपैकी सायबर चोरट्यांनी सर्वाधिक पैसा हा शेअर मार्केट ट्रेडिंग आणि डिजिटल अरेस्टच्या माध्यमातूनच शेल अकाऊंट्समध्ये वळवला आहे. एकूण १५ गुन्ह्यांमध्ये नाशिककरांनी तब्बल २५ कोटी ४ लाख ९० हजार ७६९ रुपये गमावले आहेत. टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवरील बनावट ग्रुप्सच्या माध्यमातून नागरिकांना परकीय शेल अकाऊंट्सशी जोडलेल्या बनावट ट्रेडिंग ॲप्स डाऊनलोड करायला लावून ही लूट केली गेली. तर, फेडेक्स किंवा स्काईप कॉलद्वारे भीती दाखवून केवळ ४ गुन्ह्यांमध्ये २ कोटी १६ लाख २२ हजार रुपये उकळण्यात आले आहेत. 

गुन्ह्याचा प्रकार                  दाखल गुन्हे             एकूण फसवणूक (रुपये)

स्टॉक/शेअर मार्केट ट्रेडिंग       १५                           २५,०४,९०,७६९/-

डिजिटल/हाउस अरेस्ट            ४                             २,१६,२२,२००/-

क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक            २                              २,१५,८०,८७८/-

वेबसाईट/टेलिग्राम जॉब फ्रॉड    १                              ९७,७९,०००/-

पॉलिसी परतावा/बनावट ईमेल  १                               ९२,३७,००२/-

आरटीओ चलन / APK फाईल   ३                               ५२,०४,८६३/-

रेल्वेतील नोकरीचे आमिष          २                               ३९,१७,४९९/-

इतर गुन्हे (एकूण ४१ पैकी)      १३                               ९८,००,८४७/-

एकूण                                   ४१                             ३३,१६,२४,०५८/-

ताज्या बातम्या

Shivsena UBT Crisis : संजय जाधव फुटीर खासदारांचे ‘बॉस’; परभणीत दाखल...

0
मुंबई | Mumbai राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ यश आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या...