Tuesday, June 2, 2026
HomeनगरAhilyanagar : गोदावरी-कृष्णा खोरे कार्यालय स्थलांतराला कर्मचार्‍यांचा विरोध

Ahilyanagar : गोदावरी-कृष्णा खोरे कार्यालय स्थलांतराला कर्मचार्‍यांचा विरोध

कामबंद करून जलसिंचन भवनासमोर निदर्शने

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत विविध कार्यालयांच्या प्रस्तावित स्थलांतराच्या निर्णयाविरोधात मुळा पाटबंधारे जलसिंचन भवनातील कर्मचार्‍यांनी कामबंद ठेऊन विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, अहिल्यानगर शाखेच्या वतीने स्थलांतराला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी (1 जून) जलसिंचन भवनासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात जलसंपदा विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच कार्यालयांचे स्थलांतर तातडीने रद्द करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.

- Advertisement -

या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष अशोक मासाळ, विजय तोडमल, देविदास पाडेकर, वैशाली बोडखे, मृदुला भोर, उषा देवकाते, गंगासागर उगले, अनिता निकाळजे, अश्विनी कोंडा, शुभांगी लवांडे आदींसह जलसंपदा विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटनेच्या मते, प्रस्तावित स्थलांतरामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असून शेतकरी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली कार्यालये अचानक अन्यत्र हलविणे हे कोणत्याही दृष्टीने योग्य नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

राज्यातील प्रत्येक प्रादेशिक विभागाच्या मुख्यालयातच मुख्य अभियंता कार्यालय कार्यरत असणे प्रशासकीयदृष्ट्या अधिक उपयुक्त असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. आजपर्यंत ही कार्यालये जिल्हास्तरावर नव्हती. त्यामुळे संबंधित प्रदेशातील सर्व जिल्ह्यांचा विचार करता प्रादेशिक मुख्यालयातच ही कार्यालये राहणे अधिक सोयीस्कर व परिणामकारक ठरेल, असा दावा करण्यात आला.

संघटनेने विशेषतः अहिल्यानगर पाटबंधारे विभाग आणि मुळा पाटबंधारे विभागाच्या स्थलांतरास विरोध दर्शविला आहे. अहिल्यानगर पाटबंधारे विभाग सन 1930 पासून अहिल्यानगर मुख्यालयात कार्यरत असून त्याचे लोणी (ता. राहाता) येथे स्थलांतर प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच सन 1972 पासून कार्यरत असलेल्या मुळा पाटबंधारे विभागाचे मुख्यालय राहुरी येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय मुख्य अभियंता (जसं) जलसंपदा विभाग, पुणे यांचे कार्यालय कोल्हापूर येथे, मुख्य अभियंता (विप्र) जलसंपदा विभाग, पुणे यांचे कार्यालय सोलापूर येथे आणि मुख्य अभियंता (जसं) जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालय नांदेड येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : जावयाला सासर्‍याकडून मारहाण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पत्नीला व्यवस्थित नांदवत नसल्याच्या कारणावरून जावयाला सासरे आणि चुलत सासर्‍याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस...